विकी कौशल-कतरिना कैफ ही जोडी बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. नुकतंच कतरिनाने बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये हजेरी लावली. ‘फोन बुथ’ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ती आली होती. कतरिनासह चित्रपटाची स्टार कास्ट बॉलिवूड अभिनेता ईशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदी हेदेखील शोमध्ये सहभागी झाले होते. करण जोहरने विचारलेल्या प्रश्नांना गमतीशीर उत्तरे देत कलाकारांनी दिलखुलास गप्पा मारल्या.

‘कॉफी विथ करण’ शोमध्ये कतरिनाने तिच्या आणि विकीमधील नात्याबद्दलही चर्चा केली. यादरम्यान तिने तिच्या वाढदिवसाचा एक किस्साही शेअर केला. ती म्हणाली, “मला करोना झाल्यामुळे वाढदिवशी माझी तब्येत फारशी ठीक नव्हती. माझा मूड चांगला करण्यासाठी विकीने तब्बल ४५ मिनिटे माझ्या गाण्यांवर डान्स केला. त्याला पाहून ‘याला सगळ्या स्टेप्स कशा माहीत आहेत?’, असा प्रश्न सगळ्यांना पडला होता. त्याच्या डान्स स्टेप्स तितक्या चांगल्या नव्हत्या. पण त्यामुळे माझ्या चेहऱ्यावर हसू आले”.

हेही पाहा >> Photos : सचिन पिळगावकरांच्या लेकीचं बोल्ड फोटोशूट; मोनोकिनीतील श्रियाचे फोटो पाहून चाहते अवाक

कतरिना आणि विकी दोघेही वेगळ्या संस्कृतीमधून आहेत. याबद्दल करण जोहरने विचारल्यावर कतरिना म्हणाली, “विकीचं त्याच्या आई-वडीलांबरोबरचं नातं कसं आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. विकी त्याच्या कुटुंबियांना सम्मानाने वागवतो. लग्नानंतरही यात काहीही बदल झालेला नाही”.

हेही वाचा >> VIDEO: केबीसी स्पर्धकाच्या पत्नीने बिग बींच्या चित्रपटांना म्हटलं ‘फालतू’; पाहा अमिताभ बच्चन यांची रिअॅक्शन

कतरिना पुढे म्हणाली, “विकी कौशल हे नाव फक्त मी ऐकलं होतं. पण जेव्हा मी त्याला भेटले तेव्हा मी ही त्याच्या प्रेमात पडले.” ‘कॉफी विथ करण’ शोमध्येच विकी कौशलने कतरिना कैफशी लग्न करण्याची इच्छा बोलून दाखवली होती. डिसेंबर २०२१ मध्ये विकी-कतरिनाने लग्नगाठ बांधून नवीन आयुष्याला सुरुवात केली.

Story img Loader