दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहे. विजय देवरकोंडानं करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण ७’मध्ये अनन्या पांडेसोबत हजेरी लावली होती. या शोमध्ये त्यानं त्याचं खासगी आयुष्य, प्रेम आणि सेक्स लाइफबद्दल बरेच खुलासे केले आहेत. मागच्या काही काळापासून विजय देवरकोंडा आणि दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना यांच्या नात्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे. आता करण जोहरच्या चॅट शोमध्ये विजयने रश्मिकासोबतच्या नात्याबद्दल मोठा खुलासा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘कॉफी विथ करण ७’मध्ये करण जोहरने विजय देवरकोंडाला त्याची लव्ह लाइफ आणि कथित गर्लफ्रेंड रश्मिका मंदानाबाबत प्रश्न विचारला होता. त्यावर विजय देवरकोंडा म्हणाला, “मी माझ्या करिअरच्या सुरुवातीलाच रश्मिकासोबत दोन चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ती माझी डार्लिंग आहे आणि मला ती आवडते. माझ्यासाठी ती माझी सर्वात चांगली मैत्रीण आहे. जेव्हा तुम्ही एका चित्रपटात काम करता त्यावेळी बऱ्याच गोष्टींची देवाण- घेवाण होते. एकमेकांसोबत तुम्ही चढ- उतारांना सामोरे जाता. त्यावेळी तुमच्यात एक खास नातं तयार होतं. सामान्यपणे जेव्हा तुम्ही एकत्र काम करतो तेव्हा खूप वेगाने तुमच्यामध्ये बॉन्ड तयार होऊ लागतो. पण माझ्याबाबत हे थोडं कठीण आहे, कारण मला एखाद्या मुलीसमोर बसल्यानंतर तिच्या डोळ्यात पाहून बोलणं फार कठीण आहे.”

करण जोहरनं विजय देवरकोंडाला ‘तुझं नातं कॉप्लिकेटेड आहे की तू सिंगल आहे?’ असं विचारल्यानंतर तो हसत हसत म्हणाला, “कधीतरी माझं लग्न होईल. माझं मुलं असतील. त्यावेळी मी एक गोष्ट अभिमानाने सांगेन की मी कोणावर प्रेम करतो. पण तोपर्यंत मी कोणाच्याही भावना दुखवणार नाही. माझे असंख्य चाहते आहेत. जे माझ्यावर प्रेम करतात. त्यांच्या घरी माझे पोस्टर आहे. मोबाईल वॉलपेपरला माझा फोटो आहे. या सगळ्यांच्या भावना मला सध्या दुखवायच्या नाहीत. त्यामुळे मी सध्या तरी काहीच सांगणार नाही.”

आणखी वाचा- ‘लाइगर’च्या पोस्टरवर विजय देवरकोंडाचा न्यूड फोटो, सारा अली खानची कमेंट चर्चेत

दरम्यान रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांनी ‘डियर कॉम्रेड’ आणि ‘गीता गोविंदम’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. त्यांचे हे दोन्ही चित्रपट बरेच गाजले होते. विजयच्या कामाबद्दल बोलायचं तर तो लवकरच अनन्या पांडेसोबत ‘लायगर’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाची निर्मिती करण जोहरनं केली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Koffee with karan vijay devarkonda reacts on his relationship with rashmika mandanna mrj