रविवारी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीमुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या इतर काही नेत्यांसह शिंदे गटाची साथ दिली. यावेळी अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आलं. यावेळी शपथविधीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक आमदार, खासदार उपस्थित होते. सध्या राज्याचे दोन उपमुख्यमंत्री आहेत. या घटनेनंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडला आहे. आता या घटनेवर अनेक सोशल मीडिया मराठी इन्फ्लूएन्सर व्यक्त होताना दिसत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोशल मीडिया कंटेन्ट क्रिएटर अंकिता वालावालकर ही चांगलीच सक्रीय असते. ‘कोकण हार्टेड गर्ल’ म्हणून प्रसिद्ध आहे. ती कायमच विविध राजकीय परिस्थितीवर भाष्य करत असते. तिने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. महाराष्ट्राचे राजकारण कमी ते गजकर्ण जास्त झालं, अशा आशयाचा व्हिडीओ तिने पोस्ट केला आहे.
आणखी वाचा : “ज्येष्ठ कलाकारांना पुरस्कार सोहळ्यात बसायला जागा नव्हती, पण इन्फ्लुएन्सरला…”, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याने व्यक्त केली खंत, म्हणाला “जे इतकी वर्ष…”

अंकिता वालावालकरने नुकतंच मालवणी भाषेत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यावेळी ती म्हणाली, “महाराष्ट्राचं राजकारण कमी गजकर्ण जास्त झालं आहे. या गजकर्णामध्ये आपण खूप काही शिकण्यासारखे आहे. गेल्या पाच वर्षांत सर्वांनी महाराष्ट्राला वाटून खाल्ले, त्यामुळे तुमच्या मताचा तसंही काही आदर नाही. त्यामुळे स्वत:ची मतं देणं कमी करा, लोकांची कमेंट सेक्शन जे तुम्ही भरता त्याचाही काही उपयोग नाही. तुमच्या मतालाच कोणी विचारत नाही, तर तुमच्या कमेंटना कोण विचारणार? याचा विचार करा.”

‘ही घटना म्हणजे रील स्टारसाठी कंटेट आहे. दर पावसात महाराष्ट्राची राजकारणी आम्हाला कंटेट देतात. ‘ओकेमध्ये आहे सगळं’ हे झालं, आता ही भाकर करपली, उलटकी की काय तो तवा करपला. सगळं वाट्टोळं केलं, पण रविवारची सोय झाली. आता बघूया पुढच्या रविवार काय घडतंय. अशा घडामोडी महाराष्ट्रात घडतच राहतात. या गजकर्णाची तुम्हाला सवय तुम्हाला करुन घ्यावीच लागेल.’ असे अंकिताने म्हटले आहे.

आणखी वाचा : “…तर मी दोन मुलांची आई असते”, केतकी चितळेच्या पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाली “वयाच्या चौथ्या वर्षी…”

आणखी वाचा : नागराज मंजुळेंबरोबर चित्रपटात काम करण्याची सुवर्णसंधी, तुम्हीही देऊ शकता ऑडिशन, कुठे, कधी, केव्हा?

दरम्यान अंकिताने हा व्हिडीओ शेअर करताना ‘खावन माजा’ असं कॅप्शन दिलं आहे. याद्वारे तिने राजकीय परिस्थितीवर टीका केली आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.