अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि पती राज कुंद्रा यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पश्चिम बंगालमधील कंपनीला दोन वर्षात दुप्पट पैसे देण्याचे आमिष दाखवून नऊ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
कोलकाता येथील वरिष्ठ पोलिस अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा हे इसेंशिअल स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड (इएसपीएल) या कंपनीचे मालक आहेत. या दोघांनी सदर कंपनीत एम् के मिडियाचे व्यवस्थापकीय संचालक एम् के जैन यांना नऊ कोटींचे शेअर्स विकत घेण्यास लावले होते. दोन वर्षांत दहापट परतावा देऊ असं आश्वासनही देण्यात या दोघांनी जैन यांना दिले होते. या व्यवहारानंतर शिल्पा शेट्टी यांच्या कंपनीनं इएसपीएलचे ३० लाख रुपयांचे इक्विटी शेअर्सही दिले होते. मात्र अद्याप जैन यांना कुठलाही परतावा मिळालेला नाही. याप्रकरणी कोलकाता या कंपनीने शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

Story img Loader