१९व्या कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला रविवारपासून कोलकातामध्ये सुरुवात झाली आहे. या फेस्टीवलच्या उद्धाटनाप्रसंगी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबत पश्चिम बंगालचा ब्रॅण्ड ऍम्बॅसिडर शाहरुख खान तसेच बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन, जया बच्चन, कमल हसन आणि मिथुन चक्रवर्ती देखील उपस्थित होते.
या ८ दिवसाच्या फेस्टीवलमध्ये ६३ देशांतून आलेले १८९ चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. या फेस्टिवलदरम्यान बंगाली सिनेमाची सुवर्ण जयंती देखील साजरी करण्यात येणार आहे.
कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरूवात
१९व्या कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला रविवारपासून कोलकातामध्ये सुरुवात झाली आहे.
First published on: 11-11-2013 at 12:57 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kolkata international film festival has started