‘कोण होणार करोडपती’ हा कार्यक्रम सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या कार्यक्रमातून सामान्य माणसाला आपल्या ज्ञानाच्या जोरावर करोडपती होण्याची संधी मिळते आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून ‘कोण होणार करोडपती’ला चांगला प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन खेडेकर करत आहेत. हॉटसीटवर आलेल्या प्रत्येकाशी आपुलकीने बोलून त्यांना मानसिक पाठबळ देत आहेत. ‘कोण होणार करोडपती’मध्ये आठवड्यातून एक दिवस ‘कर्मवीर विशेष’ भाग असतो. येत्या कर्मवीर एपिसोडमध्ये अभिनेता मनोज वाजपेयी आणि सयाजी शिंदे दिसणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमधील नावाजलेलं व्यक्तिमत्व म्हणून सयाजी शिंदे. ते त्यांच्या अभिनयासोबत सामाजसेवेसाठी देखील ओळखले जातात. त्यांना आजवर अनेक समाजपयोगी कामे केली आहेत. तसेच अभिनेता मनोज वाजपेयी हा देखील बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम करत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. सयाजी शिंदे आणि मनोज वाजपेयी हे कोण होणार करोडपतीच्या आगामी भागात जिंकलेली रक्कम मदत म्हणून देणार आहेत.

मनोज बाजपेयी आणि सयाजी शिंदे हे गेली बरीच वर्ष एकमेकांचे मित्र आहेत आणि त्यांनी ‘शूल’ या चित्रपटात एकत्र काम केले आहे. या चित्रपटदरम्यानच्या आठवणींना त्यांनी कोण होणार करोडपतीच्या मंचावर उजाळा दिला.

मनोज वाजपेयी हरिवंश राय बच्चन यांचा चाहता आहे. मनोज वाजपेयींने हरिवंश राय बच्चन यांची कविता मंचावर म्हणून दाखवली. मनोज वाजपेयीने सचिन खेडेकर मालिका करत असताना सचिनजींच्या अभिनयातले बारकावे पहिले आणि ते त्यांने त्याच्या आगामी चित्रपटात कसे वापरले हेही देखील सांगितले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kon honar marathi crorepati manoj bajpayee sayaji shinde avb