‘पेज थ्री’, ‘वेक अप सीड’ सारख्या सिनेमातून अभिनयाची छाप सोडणारी अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा ही पती रणवीर शौरीपासून विभक्त होणार आहे. दोघांना एक मूल असून, पाच वर्षांपूर्वीच त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर त्यांनी आता रितसर न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.
‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार कोंकणा आणि रणवीरने परस्पर सहमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. घटस्फोटाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली असून, येत्या सहा महिन्यात त्यांचा घटस्फोट होणार आहे. कोंकणा आणि रणवीरने नाते न तोडता नवीन सुरूवात करण्यासाठी समुपदेशकाची मदत घेतली होता. मात्र, त्याचा दोघांनाही फायदा झाला नाही.
आणखी वाचा : कमल हासनने अभिनेत्रीच्या परवानगी शिवाय दिला होता किसिंग सीन
कोंकणा आणि रणवीर २००७ मध्ये एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर २०१० मध्ये ते लग्न बंधनात अडकले. २०११मध्ये त्यांना मुलगा झाला. त्याचे नाव हारुन आहे. त्या दोघांनी ‘ट्रॅफिक सिग्नल’, ‘मिक्स्ड डबल्स’ आणि ‘आजा नचले’ या चित्रपटात एकत्र काम केले आहे.