अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. कोंकणाने आजवर विविध भूमिका साकारत प्रेक्षकांची मोठी पसंती मिळवली आहे. नुकतेच कोंकणाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. आपल्या लाडक्या श्वानाने ट्रेनिंग पूर्ण केल्याच्या आनंदात कोंकणाने हे फोटो शेअर केले आहेत. यात कोंकणाचा नो मेकअप लूक पाहायला मिळतोय. मात्र कोंकणाचा हा नो मेकअप लूक पाहून तिच्या एका चाहत्याने नाराजी व्यक्त केली आहे. या युजरला कोंकणाने देखील मजेशीर उत्तर दिलंय.
कोंकणा सेनशर्माच्या या फोटोवर कमेंट करत युजर म्हणाला, “तुझं वाढतं वय पाहून वाईट वाटतं. इंडस्ट्रीने तुझ्यासारख्या उत्तम कलाकाराला योग्य न्याय दिला नाही. शाळेमध्ये तू माझी क्रश होतीस. एक थी डायन नंतर मला तुझे आणखी काही सिनेमे पाहायचे होते. तू उत्तम आहेस.” या कमेंट मध्ये युजरने कोंकणाच्या वयाचा उल्लेख केला असला तरी तिचं कौतुक केलंय.
तर कोंकणाने देखील य़ुजरच्या या कमेंटला उत्तर दिलंय.ती म्हणाली, “तू वाईट वाटून घेऊ नको. तरुणीपणीच दु:खद निधन होण्यापेक्षा आनंदाने वय वाढणं जास्त बरं आहे.” कोंकणाचं हे उत्तर तिच्या या चाहत्यासह अनेकांना पसंत पडलंय. आणखी एक नेटकरी कोंकणाच्या या कमेंटवर म्हणाला, “कोणाचं वय वाढलंय, ती या वयातही जबरदस्त आहे.”
हे देखील वाचा: Raj Kundra case: ‘त्या’ पोस्टनंतर शिल्पा शेट्टीला वरुण धवन, जॅकलीन फर्नांडिससह बॉलिवूड सेलिब्रिटींचा पाठिंबा
कोंकणा नुकतीच नेटफ्लिक्सवरील सिनेमा ‘अजिब दास्तान’ मध्ये झळकली होती. याशिवाय ‘राम प्रसाद की तेरवी’ मध्ये देखील तिने प्रमुख भूमिका साकारली होती. कोंकणाने ‘पेज-३’, ‘पार्क एव्हेन्यू’, ‘ओमकारा’, ‘फॅशन’, ‘वेक अप सिड’ अशा अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत.