कोरियन अभिनेत्री पार्क सू रयून (Park Soo Ryun) हिचं निधन झालंय. तिच्या निधनाने कोरियन फिल्म इंडस्ट्री आणि चाहत्यांना सध्या धक्का बसला आहे. २९ वर्षांची पार्क सू वर्षीय ११ जून रोजी घरी जात असताना पायऱ्यांवरून खाली पडली, त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, पण तिला वाचवता आलं नाही.
हेही वाचा – “आता फक्त आठवणीतच…”, शशांक केतकरचा वडिलोपार्जित वाडा पाडला जाणार; म्हणाला, “एका घराऐवजी…”
डॉक्टरांनी पार्क सू रयूनला वाचवण्याचे खूप प्रयत्न केले पण यश आलं नाही. डॉक्टरांनी तिला ब्रेन डेड घोषित केलं. आज १३ जून रोजी तिच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. अभिनेत्रीच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबीयांनी तिचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला आहे.
रिपोर्टनुसार, तिच्या आईचं म्हणणं आहे की तिच्या मुलीचे हृदय अजूनही धडधडत आहे आणि जगात अवयवांची नितांत गरज असलेल्या व्यक्तीला आम्ही ते दान करतोय. तिचे आई-वडील या नात्याने आपल्या मुलीचे हृदय दुसऱ्याच्या शरीरात आहे आणि धडधडत आहे, याचा विचार करून आम्हाला खूप आनंद होईल, असंही त्या म्हणाल्या.
पार्क सू रयूनने २०१८ मध्ये ‘इल टेनॉर’मधून पदार्पण केलं होतं. नंतर ‘द डेज वुई लव्हड’ आणि ‘सिद्धार्थ’ या म्युझिकल व्हिडीओमध्येही ती दिसली होती. ती ‘स्नोड्रॉप’ या ऐतिहासिक नाटकासाठीही ओळखले जाते. पार्क सूच्या आकस्मिक निधनाने तिच्या कुटुंबीयांसह चाहत्यांनाही धक्का बसला आहे. चाहते सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून तिला श्रद्धांजली वाहत आहेत.