बॉलिवूड गाण्यांचं वेड फक्त भारतीयांनाच नाही तर परदेशातील लोकांनाही आहे. अनेकदा परदेशातील सेलिब्रेटीही भारतीय संगीत आणि बॉलिवूडच्या हिट गाण्यांचं कौतुक करताना दिसतात. अगदी हॉलिवूडला बॉलिवूडच्या गाण्यांनी ठेका धरायला लावला आहे आणि आता यात कोरियन लोकांचीही भर पडली आहे. कोरियातील एका कार्यक्रमाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात ते बॉलिवूडच्या गाण्यांवर धम्माल डान्स करताना दिसत आहेत.

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. जो कोरियातील ‘फॉरेनर थँक्सगिव्हिंग ग्रँड फेस्टिवल’चा आहे. पण हा व्हिडीओ व्हायरल होण्याचं कारण आहे बॉलिवूडची गाणी. या व्हिडीओमध्ये काही कोरियन परफॉर्मर्स रणवीर सिंग आण दीपिका पदुकोण यांच्या ‘राम लीला’ चित्रपटातील लोकप्रिय गाण्यांवर धम्माल डान्स करताना दिसत आहेत.

आणखी वाचा- राजामौलींच्या चित्रपटात दीपिका पदुकोणची वर्णी? महेश बाबूसह पडद्यावर रोमान्स करणार असल्याच्या चर्चांना उधाण

या व्हिडीओमध्ये हे लोक ‘राम लीला’मधील गरबा सॉन्ग आणि रणवीर सिंगवर चित्रित झालेलं, ‘रामजी की चाल देखो’ या गाण्यांवर डान्स करत आहेत. तर प्रेक्षकाही हा डान्स खूप एन्जॉय करताना दिसत आहे. प्रेक्षकांमधून टाळ्या, शिट्ट्या आणि उत्स्फुर्तपणे चिअर केल्याचा आवाज ऐकू येत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओवर अनेक भारतीयांनी कमेंट्स केल्या आहेत.

आणखी वाचा- “नैराश्याबद्दल बोलण्यासाठी मला कंपनीने पैसे…”, दीपिका पदुकोणने मानसिक आजाराबाबत केला खुलासा

दरम्यान भारतीयांमध्ये कोरियन ड्रामाचं बरंच वेड पाहायला मिळतं. पण आता कोरियामध्ये भारतीय संगीताची अशाप्रकारे क्रेज असल्याचं पाहून चाहते खुश झाले आहे. अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट करताना हे पाहून भारतीय असल्याचा अभिमान वाटतो असं लिहिलं आहे. फार कमी वेळात या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडला आहे.

Story img Loader