दक्षिण कोरियाचा गायक चोई सुंग बोंगचे निधन झाले आहे. ३३ वर्षाचा चोई सुंग बोंग दक्षिण कोरियातील सियोल येथील येओक्सम-डोंग जिल्ह्यातील त्याच्या घरी मृतावस्थेत आढळला. युट्यूबवर एक नोट शेअर केल्यानंतर दक्षिण कोरियाच्या पोलिसांना मंगळवारी सकाळी तो मृतावस्थेत आढळला. त्याने आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोकणातील गावी पोहोचला भाऊ कदम, कौलारू घरातील लाकडी फळीवर लिहिलेली ‘ती’ दोन वाक्ये चर्चेत

‘कोरिया टाईम्स’च्या वृत्तानुसार, ३३ वर्षीय सुंग बोंग मंगळवारी सकाळी ९.४१ वाजता राहत्या घरी पोलिसांना मृतावस्थेत आढळला. बुधवारी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याने आत्महत्या केली. त्याच्या यूट्यूब चॅनेलवर अपलोड केलेल्या एका नोटमध्ये लिहिले आहे, “माझ्या चुकीमुळे ज्यांना त्रास झाला आहे त्या सर्वांची मी मनापासून माफी मागतो.” सर्व डोनेशन्स परत करण्यात आल्याचं त्याने म्हटलं होतं.

कोरियाच्या ‘गॉट टॅलेंट’मध्ये दुसरा क्रमांक पटकावल्यानंतर तो प्रसिद्ध झाला होता. परंतु २०२१ मध्ये त्याने खोटा दावा केला होता की तो अनेक कर्करोगांशी लढत आहे. यानंतर त्याला मोठी रक्कम मिळाली. मात्र, सुंग बोंगने काही काळाने आपल्या चुकीची कबुली दिली आणि त्याला मिळालेले सर्व पैसे परत करण्याचे आश्वासन दिले होते. आता मृत्यूपूर्वी शेअर केलेल्या नोटमध्ये त्याने पैसे परत केल्याचं म्हटलं आहे. सुंग बोंगचे निधन झाल्याची बातमी समोर आल्यानंतर चाहते त्याला श्रद्धांजली वाहत आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Korean singer choi sung bong found dead day after sharing note on youtube channel hrc