अभिनयातील दमदार कामगिरीनंतर अभिनेत्री क्रांती रेडकर आणि अभिनेता सुबोध भावे आता आपल्या स्वरांची किमया रसिकांना दाखवणार आहेत. १७ जून ला प्रदर्शित होणाऱ्या किरण कुलकर्णी V/S किरण कुलकर्णी या चित्रपटातील प्रमोशनल सॉंग या दोघांनी गायलं आहे. ‘आता होऊ दे खुश्शाल खर्च’ असे बोल असणारं हे गीत मंदार चोळकर यांनी लिहिलं असून वैशाली सामंत यांचं संगीत या गाण्याला लाभलं आहे.
गायनाची ही नवी इनिंग आम्ही खूपच एन्जॉय केली, असं सांगत हे गाणं गाताना मजा आल्याचं सुबोध आणि क्रांतीने सांगितलं. तसेच हे फुल ऑन गाणं प्रत्येकालाच ठेका धरायला लावेल असा विश्वासही या दोघांनी व्यक्त केला.
ओम प्रॉडकशन्स प्रस्तुत व कांचन अधिकारी दिग्दर्शित किरण कुलकर्णी V/S किरण कुलकर्णी  हा सायबर क्राइमवर आधारलेला कॉमेडी क्राइम सिनेमा आहे. या चित्रपटाचा कथाविस्तार व दिग्दर्शन कांचन अधिकारी यांचं आहे. लेखन आशिष पाथरे यांचं आहे. छायांकन सुरेश देशमाने यांचं असून संकलन आनंद दिवान यांनी केलं आहे.  कांचन अधिकारी व ओम गहलोट निर्मित व पियुष गुप्ता सहनिर्मित किरण कुलकर्णी V/S किरण कुलकर्णी  या चित्रपटात सुबोध भावे, क्रांती रेडकर, मोहन जोशी, अविष्कार दारव्हेकर, प्रिया मराठे, नम्रता आवटे, माधवी गोगटे, धनंजय मांजरेकर, अमित कल्याणकर व बालकलाकार उर्मिका गोडबोले यांच्या भूमिका आहेत. १७ जून ला किरण कुलकर्णी V/S किरण कुलकर्णी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा