संगीत अर्थात सूर, लय आणि ताल यांचा सुरेख संगम. संगीताची ही किमया महाराष्ट्राच्या संस्कृतीचा गाभा आहे. महाराष्ट्राला संगीत परंपरेचा मोठा वारसा लाभलेला आहे. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात संगीत व्यापून राहिले आहे. किंबहुना माणसाच्या आयुष्यातील प्रत्येक भावना तो संगीताच्या सोबतीने अनुभवून जगतो. अशा संगीतावर भरभरून प्रेम करणाऱ्या मराठी प्रेक्षकांसाठी झी युवा ही वाहिनी ‘संगीत सम्राट’ हा एक अनोखा  संगीतमय कार्यक्रम  घेऊन आली आहे. महाराष्ट्राच्या मातीत रुजलेले अनेक गायक, वादक आणि ज्यांच्या श्वासात संगीत आहे असे अनेक कलावंत संगीत सम्राटाच्या व्यासपीठाद्वारे  मराठी रसिकांसमोर त्यांची कला सादर करणार आहेत.

महाराष्ट्रातील आघाडीचा गायक आदर्श शिंदे सूर, ताल आणि लय या मुद्दय़ांद्वारे कलाकारांचे  परीक्षण करणार आहेत  तर मराठी चित्रपटसृष्टीतील  आघाडीची नायिका क्रांती रेडकर वानखडे कलाकारांचे सादरीकरण किती मनोरंजनात्मक आहेत याचे परीक्षण करणार आहे. त्याचप्रमाणे तरुणाईचा लाडका गायक रोहित राऊत आणि अभिनेत्री ऊर्मिला निंबाळकर यांनी निवेदनाची भूमिका सांभाळली आहे .
कलाकाराच्या कलेचे चीज करणारी पारखी नजर असेल तर समाजातील कोणताही कलाकार रसिकांसमोर येऊ  शकतो या विश्वासातून झी युवाने ‘संगीत सम्राट’ या संगीतावर आधारित वेगळ्या संकल्पनेला आकार दिला आहे. २६ जून पासून सोमवार ते शुR वार रात्री ९ वाजता ‘संगीत सम्राट’ची मैफल रंगणार आहे. ‘झी युवा’ आणि ‘झी टॉकीज’चे व्यवसायप्रमुख बवेश जानवलेकर यांनी ‘संगीत सम्राट’ या कार्यक्रमाबद्दल सांगितले की, ‘‘मराठी प्रेक्षकांची संगीत क्षेत्रातील आवड लक्षात घेऊन फार कमी कार्यक्रम आजवर छोटय़ा पडद्यावर आले आहेत. सर्वसामान्यांमध्ये दडलेला आणि संगीताशी नाळ जोडलेला कलाकार समाजासमोर यावा, त्याचप्रमाणे कलाकारांसोबत चांगला श्रोता घडावा या हेतूने ‘झी युवा’ने गेल्या महिन्याभरापासून महाराष्ट्राचा कानाकोपरा पिंजून काढला आहे. महाराष्ट्रातील  सहा शहरांमध्ये झालेल्या निवडचाचणीत  हजारोंच्या संख्येने संगीत कलाकारांनी उपस्थिती लावली. कुणी ढोल वाजवून तालाशी समरस झाला, कुणी गाण्यातील प्रयोगशील सुरांमध्ये रमला तर कुणी पारंपरिक वाद्यातून नवे झंकार देण्यात यशस्वी झाला. तर कुणी हाताला येईल ते काहीही वाजवून आमचे कान तृप्त केले. असे जिद्दी कलाकार मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, औरंगाबाद आणि नाशिक  या शहरांमधून  शोधून काढले आहेत.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

‘संगीत सम्राट’ या शोच्या निमित्ताने मराठी प्रेक्षकांना अशा अनेक कलाकारांना भेटायला मिळणार आहे ज्यांच्या संगीतमय आयुष्याचा  प्रवास प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरू शके ल. यात असे कलावंत आहेत ज्यांनी अगदी हलाखीच्या परिस्थितीतही आपली संगीत साधना जोपासली आहे. तर काही स्पर्धकांच्या जवळच्या लोकांनी कलेच्या यशासाठी केलेले त्याग थक्क करणारे आहेत.  आधुनिक आणि पारंपरिक संगीताचा अनोखा  मेळ या कार्यक्रमामुळे रसिक प्रेक्षकांना पाहण्याची पर्वणी झी युवाच्या ‘संगीत सम्राट’मुळे  मिळणार आहे.

Story img Loader