अभिनेत्री क्रांती रेडकर सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात असते. नुकतीच क्रांतीने भाजपा मुंबई्च्या वतीने आयोजित चित्रपट आणि टेलिव्हिजन क्षेत्रातील महारोजगार मेळाव्यात हजेरी लावली होती. याचे काही फोटो क्रांतीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

क्रांतीने ट्विटरवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि अभिनेता जॅकी श्रॉफ दिसत आहेत. हे फोटो शेअर करत “जॉब फेअर-महाविकास मेळावा, सन्माननीय अमृता फडणवीस आणि जॅकी श्रॉफ यांच्यासोबत सहभागी होताना मला आनंद झाला. चित्रपत आघाडी ४, ज्या लोकांना चित्रपट, टेलिव्हिजन आणि OTT प्लॅटफॉर्मचा भाग बनण्याची इच्छा आहे. त्यांच्यासाठी या उपक्रमाची सुंदर सुरुवात केली आहे”, असे क्रांती म्हणाली.

आणखी वाचा : “मी तुमच्या आणि तुमच्या पत्नीच्या पाया पडलो आणि तुम्ही…”, शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर विवेक अग्निहोत्रीने दिलं उत्तर

आणखी वाचा : “तू तर रोजा पाळत नाही किमान मुलांना तरी…”, रमजानच्या महिन्यात हॉटेलमध्ये गेल्यामुळे नेटकऱ्यांनी केले ट्रोल

आणखी वाचा : “जेव्हा मुस्लीम बहुसंख्याक असतो तेव्हा हिंदू…”, शरद पवारांचं The Kashmir Files वरील वक्तव्य चर्चेत

या व्यतिरिक्त अमृता फडणवीस यांनी देखील ट्विटरवर काही फोटो शेअर केले आहेत. “महारोजगार मेळाव्याचे उद्घाटन मंगल प्रभात लोढा आणि जॅकी श्रॉफ यांच्या सोबत करणे हा एक सन्मान होता. या कार्यक्रमाचे आयोजन हे भाजपा मुंबईने केले होते. चित्रपत आघाडी ४, ज्या लोकांना चित्रपट, टेलिव्हिजन आणि OTT प्लॅटफॉर्मचा भाग बनण्याची इच्छा आहे. त्यांच्यासाठी या उपक्रमाची सुंदर सुरुवात केली आहे. या दिशेनं पहिल्यांदाच उचलण्यात आलेला मोठा पुढाकार!”, असे अमृता फडणवीस यांनी कॅप्शन दिले आहे. दरम्यान, अमृता फडणवीस आणि क्रांती रेडकर यांनी शेअर केलेले हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kranti redkar amruta fadnavis jacky shroff at chitrapat aghadi 4 bjp job fair maha rojgar melava dcp