आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणी कोणतीही शहानिशा न करता आपल्या नावाचा उल्लेख केल्याप्रकरणी संबंधित वाहिनीवर येत्या दोन ते तीन दिवसांत अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे अभिनेत्री क्रांती रेडकर हिने सांगितले. स्पॉट फिक्सिंगमध्ये संबंधित वाहिनीने कोणत्याही पुराव्याअभावी तसेच खातरजमा न करता आपल्या नावाचा सूचक उल्लेख केला होता. वास्तविक मी ७ मेपासून कोकणातील कुडाळ येथे चित्रीकरण करत आहे. त्यामुळे माझा या फिक्सिंगमध्ये कसा काय संबंध येतो, असा सवाल उपस्थित करून क्रांती म्हणाली, केवळ टीआरपी वाढविण्यासाठीच या वाहिनीने हा उद्योग केला आहे. माझ्या घरी पहिल्यापासूनच क्रिकेटचे वातावरण आहे. वडिलांना तर क्रिकेट प्रचंड आवडते. त्यामुळे मलाही याबद्दल थोडीफार माहिती आहे. पण त्याकडे केवळ एक चांगला व निकोप खेळ म्हणूनच पाहिले जाते. पण उगाचंच कोणतीही शहानिशा न करता स्पॉट फिक्सिंगमध्ये माझ्या नावाचा सूचक उल्लेख करण्यात आला हे खूपच क्लेशदायक असल्याचे क्रांतीने सांगितले.
मी श्रीशांतला कधीही भेटले नाही, तसेच मी त्याला ओळखतच नसल्याने त्याच्याशी माझा संबंध कसा जोडला गेला, असा प्रश्न उपस्थित करून ती म्हणाली की, त्या वृत्ताने आम्हाला खूपच मनस्ताप झाला.
संग्रहित लेख, दिनांक 25th May 2013 रोजी प्रकाशित
‘त्या’ वाहिनीविरुद्ध क्रांती अब्रुनुकसानीचा दावा करणार
आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणी कोणतीही शहानिशा न करता आपल्या नावाचा उल्लेख केल्याप्रकरणी संबंधित वाहिनीवर येत्या दोन ते तीन दिवसांत अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे अभिनेत्री क्रांती रेडकर हिने सांगितले. स्पॉट फिक्सिंगमध्ये संबंधित वाहिनीने कोणत्याही पुराव्याअभावी तसेच खातरजमा न करता आपल्या नावाचा सूचक उल्लेख केला होता.
First published on: 25-05-2013 at 02:52 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kranti redkar file defamation suit against the channel