गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्री क्रांती रेडकर पती समीर वानखेडे यांच्यामुळे चर्चेत आहे. सतत समीर वानखेडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तसेच महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यामधील आरोप प्रत्यारोप सुरु आहे. क्रांती सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. क्रांतीने नुकतीच एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्या पोस्टमुळे क्रांतीला ट्रोल करण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

क्रांतीने तिच्या ट्विटर अकाऊंटवरून हे ट्वीट शेअर केले आहे, या ट्वीटमध्ये क्रांतीने एक बातमी शेअर केली आहे. या बातमीत मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल टर्मिनल इथे एनसीबीने ४ कोटी रुपयांची किंमत असलेला हेरॉइन जप्त केलं. हे बातमी शेअर करत “शब्बास शेरा” असे कॅप्शन क्रांतीने दिले आहे. क्रांती शब्बास शेरा हे समीर वानखेडेंना बोलली आहे.

आणखी वाचा : “पहिल्याच डेटवर बॉयफ्रेंडने केली शरीरसुखाची मागणी…”, ‘तारक मेहता…’ मालिकेतील अभिनेत्रीने केला खुलासा

आणखी वाचा : “पैसे टाकले म्हणून तिने राज कुंद्राशी लग्न केलं!”; अनिल कपूरच्या विधानावर शिल्पा शेट्टीने दिलं उत्तर, म्हणाली…

क्रांतीचे हे ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. एक नेटकरी म्हणाला, “काय शब्बास शेरा? हा त्याच्या नोकरीचा भाग आहे, खुर्च्या उबवायला सरकार पगार देत नाही समजलं का?बर तो विषय सोडा आज समीर भाऊंना डब्याला दाल फ्राय/जीरा राईस दिला का? सहज आपलं विचारल रोज रोज १९६ रुपयांची दाल मखनी खाऊन कंटाळले असतील. १९६ रुपयाची दालमखनी ताज की ऑबेरॉय मधुन मागवली होती?” अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी क्रांतीला ट्रोल केलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kranti redkar got troll for calling sameer wankhede shera dcp