गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्री क्रांती रेडकर पती समीर वानखेडे यांच्यामुळे चर्चेत आहे. सतत समीर वानखेडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तसेच महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यामधील आरोप प्रत्यारोप सुरु आहे. क्रांती सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. क्रांतीने नुकतीच एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

क्रांतीने तिच्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ समीर वानखेडेंचा आहे. क्रांतीने शेअर केलेला हा व्हिडीओ एका नेटकऱ्यांने शेअर केला होता. त्यानंतर क्रांतीने हा रिट्वीट केला आहे. या व्हिडीओच्या बॅकग्राउंडला बाहुबली हे गाणं सुरु आहे. नवाब मलिक हे त्यांनी केलेल्या वक्तव्यांमध्ये गोंधळून गेले आहेत. आडच्या परिषदेत ते काय बोलत आहेत तर काही खोटी कारण देत आहेत. आम्ही समीर सर आणि त्यांच्या कुटुंबासोबत खंबीरपणे उभे आहोत असे ट्वीट त्या नेटकऱ्याने केले होते. हे ट्वीट पाहताच क्रांतीने ते रिट्वीट केले.

आणखी वाचा : “पैसे टाकले म्हणून तिने राज कुंद्राशी लग्न केलं!”; अनिल कपूरच्या विधानावर शिल्पा शेट्टीने दिलं उत्तर, म्हणाली…

आणखी वाचा : फोटो बच्चन कुटुंबाचा पण चर्चा मात्र भिंतीवरच्या पेंटिंगची, किंमत ऐकलीत का?

या आधी क्रांतीने एक ट्वीट केल्यामुळे तिला ट्रोल करण्यात आलं होतं. क्रांतीने एक बातमी शेअर केली होती. या बातमीत मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल टर्मिनल इथे एनसीबीने ४ कोटी रुपयांची किंमत असलेला हेरॉइन जप्त केलं. ही बातमी शेअर करत “शब्बास शेरा” असे कॅप्शन क्रांतीने दिले आहे. क्रांती शब्बास शेरा हे समीर वानखेडेंना बोलली आहे. क्रांतीच्या या ट्वीटमुळे सोशल मीडियावर तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kranti redkar shares video sameer wankhede where netizen call him bahubali dcp