काही दिवसांपासून एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे हे आर्यन खान प्रकरणामुळे चर्चेत होते. त्यांचा आज वाढदिवस आहे. याच निमित्ताने त्यांची पत्नी क्रांती रेडकरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. क्रांती सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. या पोस्टमध्ये क्रांतीने समीर यांच्या कामाचं कौतुक केलं आहे. तिची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.
क्रांतीने ही पोस्ट तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केली आहे. या पोस्टमध्ये क्रांतीने समीर यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत समीर वानखेडेंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मी नेहमी तुमच्याबद्दल आणि तुमच्या शौर्याविषयी खूप काही लिहिते, परंतु आज शब्द कमी पडत आहेत. देशातील अमली पदार्थांशी निगडीत दुष्टांशी लढा देणं ही एक गोष्ट तर आहे, परंतु तुमच्या या मोहिमेत तुम्हाला रोखणाऱ्या सर्वांविरुद्ध लढा देणं हा एक मोठा संघर्ष आहे. या संघर्षाचा तुम्ही दररोज सामना करत आहात आणि त्यावर दररोज तुम्ही मात करत आहात. तुम्ही खूप चांगलं काम करत आहात, समाजातील घाण काढू टाकत आहात. त्यासोबत तरुणांना योग्य मार्ग दाखवत आहात, त्यांच्या भल्यासाठी काम करत आहात (आता कदाचित त्यांना ही बाब समजणार नाही), असे क्रांती म्हणाली.
आणखी वाचा : ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीवर कतरिनाचा भाऊ फिदा! पोस्ट शेअर करत म्हणाला…
आणखी वाचा : “हिला कसला एवढा अॅटिट्यूड…”, जान्हवीचा व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले
पुढे क्रांती म्हणाली, “तुमच्यावर जनतेचा आशीर्वाद आहे. सामान्य माणूस हा खूप हुशार आहे. योग्य काय अयोग्य काय, कोण खोटं आणि खरं हे त्यांना बरोबर माहित असतं. तुम्ही फक्त काम करत रहा, अखंडता कशी दिसते ते जगाला दाखवा. जे लोक खरोखरच आपल्या समाजाची काळजी घेतात, आपल्या राष्ट्रावर प्रेम करतात आणि तुमच्यावर प्रेम करतात तेच लोक महत्त्वाचे आहेत’, असे कॅप्शन क्रांतीने दिले आहे.”