सध्या बॉलिवूड कलाकारांपेक्षा त्यांची मुलचं सध्या चर्चेमध्ये आहेत. कधी श्रीदेवीची मुलगी लाइम लाइटमध्ये येते तर कधी शाहरुख खानची मुलगी सुहाना. अशा अनेक बॉलिवूड कलाकारांच्या मुली आहेत ज्यांच्यासाठी सोशल मीडिया हा पब्लिसिटी मिळवण्याचा एक व्यासपीठच बनले आहे. अमिताभ बच्चन यांची नात नव्यानवेलीही इन्स्ट्राग्रावर सक्रीय असते. सध्या शाहरुखची मुलगी सुहानानंतर सगळ्यात जास्त चर्चा कोणाची असेल तर ती म्हणजे जॉकी श्रॉफची मुलगी कृष्णा श्रॉफ हीची.
बॉलिवूडमधल्या स्टार मुलींपैकी एक अशी कृष्णाची ओळख आहे. कृष्णा सध्या तिने इन्स्ट्राग्रामवर टाकलेल्या फोटोमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिने इन्स्ट्राग्रामवर टाकलेल्या या फोटोमध्ये ती स्विमिंग पूलमध्ये उभी असलेली दिसत आहे. तिने या फोटोला कॅप्शनही दिले आहे. या अशा रात्री.. मन, शरीर आणि आत्मा शांत करण्याची वेळ…
कृष्णा सोशल मीडियामध्ये फार सक्रिय आहे. याआधी तिने टॉपलेस फोटोशूट केले होते. त्यासाठीही तिचे नाव चर्चेत आले होते. तिने हे फोटो तिच्या इन्स्ट्राग्राम अकाऊंटवर शेअर केले होते. कृष्णाला आतापर्यंत अनेक सिनेमांच्या ऑफर्सही आल्या आहेत. पण तिला अभिनयात फारसा रस नसल्यामुळे तिने या सर्व ऑफर्सना ठामपणे नकारही दिला. तिला आपल्या भावासारखे कॅमेऱ्याच्या समोर उभे राहण्यापेक्षा मागेच उभे राहणे अधिक पसंत आहे. तिने ट्रान्सजेण्डर समुदायावर एक लघुपटही बनवला होता. या लघुपटाचे दिग्दर्शन तिने स्वतः केले होते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ती लवकरच टायगरच्या आगामी सिनेमात सह-दिग्दर्शक म्हणून काम करणार आहे.