हॉलिवूड चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री क्रिस्टन स्टीवर्ट सध्या चर्चेत आहे. ‘ट्वायलाइट’ या चित्रपटामुळे ती जगभरात लोकप्रिय झाली. आता क्रिस्टन तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. या चर्चा तिने गर्लफ्रेंडसोबत लग्न करत असल्याची माहिती दिल्यामुळे सुरु झाल्या आहेत.
क्रिस्टनने नुकतीच ‘द हावर्ड स्टर्न शो’मध्ये हजेरी लावली. या शोमध्ये तिला खासगी आयुष्याविषयी अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. ती सध्या डिलन मेयरला डेट करत असून लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची माहिती तिने दिली आहे. तसेच मेयरनेच लग्नासाठी विचारले होते असा खुलासा क्रिस्टनने केला आहे.
‘मी मेयरला लग्नासाठी विचारणार होते. पण तिनेच मला विचारलं. आम्ही लवकरच लग्न करणार आहोत’ असे क्रिस्टनने म्हटले आहे. क्रिस्टन आणि मेयर यांची ओळख २०१९मध्ये एका पार्टीमध्ये झाली होती. त्यानंतर त्या अनेकदा भेटू लागल्या. काही दिवसांनंतर त्यांनी एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली. यापूर्वी क्रिस्टनने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मेयरसोबतचा फोटो शेअर केला होता.
क्रिस्टन लवकरच ‘स्पेंसर’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती प्रिंसेस डायनाची भूमिका साकरताना दिसणार आहे. या चित्रपटातील तिची भूमिका पाहण्यासाठी चाहते फार उत्सुक आहेत.