बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे यांचा ब्रेकअप होईल याचा कुणी विचारच केला नसेल. गेल्या सहा वर्षांपासून हे दोघेही ‘लिव्ह इर रिलेशनशिप’मध्ये एकत्र राहात होते. पण अचानक या दोघांच्या नात्यात दुरावा आला आणि सुशांतने त्यांचा ब्रेक अप झाल्याचे सोशल मिडियावर जाहीर केले.
अंकितासोबतच्या ब्रेकअपनंतर सुशांत आणि अभिनेत्री क्रिती सनॉन यांच्या डेटींगच्या चर्चा सुरु झाल्या. त्यानंतर अंकितासोबतचा ब्रेकअप आणि क्रितीसोबत त्याचे नाव जोडल्या जाणा-या चर्चांपासून लांब राहण्यासाठी सुशांतने त्याचे इन्स्टाग्राम आणि ट्विटर अकाउन्ट २२ मे रोजी बंद केले होते. पण आता सुशांतनेच स्वतः नेटीझन्सना चर्चेसाठी विषय दिला आहे. त्यानंतर जवळपास २० दिवसांनंतर सुशांत आता सोशल मिडियावर परतला आहे. विशेष गोष्ट म्हणजे त्याने सोशल मिडियावर पुनरागमन करताच क्रितीसोबतचा सेल्फी पोस्ट केला आहे. आता याला काय म्हणाव राव? चर्चेत राहण्यसाठी सेलेब्रिटी काय करतीय याचा काही नेम नाही.
क्रिती सनॉन आणि सुशांत हे ‘राब्ता’ चित्रपटासाठी सध्या शूटींग करत आहेत. हा चित्रपट रोमॅण्टिक चित्रपट असून याची शूटींग बुडापेस्टमध्ये केली जात आहे. या चित्रपटादरम्यान या दोघांमध्ये जवळीक वाढल्याचे बोलले जात आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा