बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. क्रिती ही नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असते. यंदा क्रितीचे अनेक मोठे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. त्यासाठी ती प्रचंड मेहनत घेताना पाहायला मिळत आहे. क्रितीने तिच्या करिअरमध्ये आतापर्यंत अनेक अभिनेत्यांसोबत काम केले आहे. त्यातील काही चित्रपट सुपरहिट ठरले तर काही मात्र बॉक्स ऑफिसवर दणक्यात आपटले. यातील एक चित्रपट म्हणजे राबता. या चित्रपटात तिने अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबत स्क्रीन शेअर केली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नुकतंच क्रितीने एका प्रसारमाध्यमाला मुलाखत दिली. त्यावेळी तिने या चित्रपटाबद्दल आणि सुशांतबद्दल खुलासा केला. “बॉक्स ऑफिसवर राबता चित्रपटाची सुरुवात खराब झाल्यानंतर मी, दिनेश विजान आणि सुशांत सिंह राजपूतसोबत वाईन प्यायली होती. वाईनची बाटली घेऊन या चित्रपटात नेमकं काय चुकले यावर आम्ही चर्चा केली होती,” असे क्रितीने सांगितले.

“राबता हा चित्रपट ज्या दिवशी प्रदर्शित होणार होता त्यादिवशी मी आणि सुशांत प्रचंड उत्सुक होतो. या चित्रपटाकडून आम्हाला दोघांनाही प्रचंड आशा होत्या. मात्र बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे आम्ही दोघेही फार निराश झालो,” असेही क्रितीने सांगितले.

यापुढे तिने म्हटले की, “चित्रपटाच्या बाबतीत जे काही घडले ते आपण स्वीकारले पाहिजे. ते फार आवश्क आहे. तुम्ही एखादा चित्रपट बनवत आहात आणि तो प्रेक्षकांना समजत नाही. जर त्यांना समजत नसेल तर ती तुमची चूक आहे. आपण असे म्हणू शकत नाही. त्यावेळी तुम्ही हा चित्रपट बनवत होता. त्यामुळे तुम्ही प्रेक्षकांशी जोडणे गरजेचे होते.”

“जर ती आनंदी असेल तर…”, समांथासोबत घटस्फोटानंतर पहिल्यांदाच नागाचैतन्यने सोडले मौन

या मुलाखतीत क्रितीने सुशांत सिंहबद्दलची एक आठवणही सांगितली. “मला आजही तो दिवस चांगला आठवतो. ती रात्र खूप मजेशीर होती. आमचा चित्रपट चालला नाही याचे आम्हाला दु:ख होते. आम्ही नैराश्यात होतो. आमच्या चित्रपटाला खूप वाईट रिव्ह्यू मिळाले याचेही फार वाईट वाटत होते. यानंतर मग आम्ही वाईनची बाटली उघडली. ती बाटली घेऊन या चित्रपटात नेमकं काय चुकले यावर आम्ही चर्चा केली होती,” असा किस्साही क्रितीने सांगितला.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kriti sanon had a wine with sushant singh rajput recalls the night when she sulked over nrp