करण जोहरचा चॅट शो ‘कॉफी विथ करण ७’च्या आगामी एपिसोडमध्ये ‘हिरोपंती’ चित्रपटातील मुख्य कलाकार टायगर श्रॉफ आणि क्रिती सेनॉन हजेरी लावताना दिसणार आहेत. नुकताच या एपिसोडचा प्रोमो प्रसारित झाला आहे. ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. टायगर आणि क्रिती यांना पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत. या एपिसोडमध्ये क्रिती सेनॉनने, ‘माझ्या चित्रपटांबद्दल मी सर्वात आधी आईशी चर्चा करते’ असा खुलासा केला.

करण जोहरने मागच्या एपिसोडमध्ये कियारा आडवाणीशी बोलताना याचा उल्लेख केला होता की, ‘लस्ट स्टोरीज’साठी त्यांनी कियाराच्या आधी क्रिती सेनॉनला विचारलं होतं. मात्र क्रितीने तिच्या आईच्या सांगण्यावरून ही भूमिका साकारण्यास नकार दिला होता. ज्यानंतर करण जोहरने कियारा आडवाणीला या भूमिकेसाठी कास्ट केलं. पण आता या एपिसोडमध्ये जेव्हा करणने याविषयी क्रितीला विचारलं तेव्हा तिने चित्रपटाबद्दल तिच्या आईशी चर्चा करत असल्याचं कबुल केलं. यासोबतच काही भूमिकांना ती केवळ आईच्या सांगण्यावरून नकार देते. असंच ‘लस्ट स्टोरीज’च्या वेळी झाल्याचंही तिने मान्य केलं.
आणखी वाचा- २७ वर्षीय प्रसिद्ध कोरियन अभिनेत्रीची आत्महत्या; सुसाइड नोटमध्ये लिहिलं, “मी दुःखी नाही पण…”

Rahul Narwekar
Rahul Narwekar : संख्याबळ नाही तरीही मविआला विरोधी पक्षनेतेपद देणार का? राहुल नार्वेकरांनी स्पष्टच सांगितलं
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
vidarbha parties prahar janshakti vanchit bahujan aghadi
लोकजागर : वैदर्भीय पक्षांची ‘वंचना’
Bajrang Sonwane meets Amit Shah
“बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सीआयडी चौकशी व्हावी”; शरद पवारांचा खासदार थेट अमित शाहांना भेटला
Dismissed police officer killed woman with scarf over immoral relationship
नागपूर : अनैतिक संबंध! बडतर्फ पोलीस कर्मचाऱ्याने प्रेयसीचा गळा आवळला, मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी…
Satish Wagh murder case, Pune police, Pune ,
सतीश वाघ हत्या प्रकरण : नवनाथ गुरसाळे आणि पवन शर्मा दोन आरोपींना अटक अन्य आरोपींचा शोध सुरू
loksatta readers response loksatta news
लोकमानस : सत्यकथनासाठी निवृत्तीचा मुहूर्त
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!

क्रिती म्हणाली, “माझ्या आईने मला ‘लस्ट स्टोरीज’मधील भूमिकेसाठी नकार दिला होता. कारण त्यातील बोल्ड सीन तिला आवडले नव्हते. त्यामुळे मी या भूमिकेला नकार दिला.” जेव्हा या शोमध्ये क्रितीला विचारण्यात आलं की, ‘निर्मात्यांनी ऑफर केलेल्या प्रत्येक भूमिकेसाठी तू आईशी चर्चा करतेस का?’ त्यावर ती म्हणाली, “मी एका मध्यमवर्गीय कुटुंबात मोठी झालेय. त्यामुळे असे बोल्ड किंवा वादग्रस्त सीन त्यांच्यासाठी धक्कादायक ठरू शकतात. त्यामुळे मी आईशी बोलते. पण मी नेहमीच चर्चा करत नाही.”

आणखी वाचा- “कॉफी विथ करणमध्ये मी या सेलिब्रिटींना बोलवण्याचं धाडस करणार नाही कारण…” करण जोहर स्पष्टच बोलला

दरम्यान ‘कॉफी विथ करण ७’मध्ये क्रिती सेनॉनने खुलासा केला आहे की, ‘हिरोपंती’साठी निवड होण्याआधी तिने करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द ईयर’साठी ऑडिशन दिली होती आणि तिला या ऑडिशनमध्ये रिजेक्ट करण्यात आलं होतं. या एपिसोडचा प्रोमो चर्चेत असून यात टायगर आणि क्रिती यांच्यातील बॉन्डिंगही पाहायला मिळणार आहे.

Story img Loader