बॉलीवूड सुपरस्टार सलमान खान सध्या आगामी ‘बजरंगी भाईजान’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. मात्र, ‘बजरंगी भाईजान’पाठोपाठ आता सलमानच्या त्यापुढील ‘सुलतान’ चित्रपटाची चर्चा देखील दिवसेंदिवस रंगण्यास सुरूवात झाली आहे. ‘सुलतान’ चित्रपटात सलमानची सहकलाकार म्हणून हिरोपंती चित्रपटात झळकलेली अभिनेत्री क्रिती सनॉनची निवड करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. वृत्ताला अद्याप अधिकृत दुजोरा मिळाला नसला तरी सुत्रांच्या माहितीनुसार चित्रपटाच्या कथेची संपूर्ण कल्पना क्रिती सनॉनला देण्यात आल्याचे समजते. क्रिती सनॉन सध्या बॉलीवूड बादशाह शाहरुख खानसोबतच्या ‘दिलवाले’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे.
‘सुलतान’ चित्रपटाची निर्मिती यश राज फिल्मच्या बॅनरखाली केली जाणार असून दिग्दर्शक अली अब्बास झाफर चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. २०१६ च्या ईदच्या मुहूर्तावर ‘सुलतान’ चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

Story img Loader