अभिनेता, समीक्षक केआरके नेहमीच चर्चेत असतो. तो सोशल मीडियावर सतत व्यक्त होत असतो. काही दिवसांपूर्वी त्याने स्वत:चे खान हे आडनाव बदलून कुमार हे आडनाव लावायला सुरुवात केली. तेव्हा पासून तो ‘कमाल राशिद कुमार’ या नावाचा वापर करायला लागला आहे. केआरके ट्विटरवर सक्रिय आहे. त्याचे ट्वीट्स नेहमी व्हायरल होतात. ट्विटरच्या माध्यमातून केआरके वेगवेगळ्या विषयांवर प्रतिक्रिया देत असतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

केआरके बऱ्याचदा आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे अडचणीत आला आहे. नुकतंच त्याने भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांच्याबद्दल एक खळबळजनक विधान केले. केआरकेने एका ट्वीटमध्ये, ‘विराट कोहली हा नैराश्याचा सामना करणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू आहे. हा एका अभिनेत्रीशी लग्न केल्याचा परिणाम आहे. अनुष्काने विराट तुला नैराश्याचा त्रास आहे असे सांगितलं आहे.’ असे म्हणत विराटच्या खराब फॉर्मला अनुष्काच जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. या ट्वीटला मिळालेल्या नकारात्मक प्रतिसादानंतर केआरकेने ते ट्वीट काढून टाकले. मात्र याचे स्क्रिनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
आणखी वाचा- जेव्हा सलमान खानच्या रागामुळे ऐश्वर्याचं झालं होतं मोठं नुकसान, शाहरुखनेही समजावलं पण…

केआरकेच्या दुसऱ्या ट्वीटमध्ये त्याने विराट कोहलीवर एक व्हिडीओ बनवणार असल्याचे जाहीर केले आहे. या ट्वीटमध्ये ‘विराट कोहलीसारख्या उत्तरेकडच्या तगड्या मुलाला नैराश्य कसे आले ?’ असे म्हटले आहे. स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये विराटने त्याच्या मानसिक स्थितीची माहिती दिली. विराट म्हणाला की, “मी मानसिकरित्या खचलो आहे आणि मी ते न घाबरता मान्य करत आहे. हे सर्व खूप नॉर्मल असलं तरी आपण या मुद्दयांवर बोलणं नेहमी टाळत असतो. मानसिकरित्या हतबल दिसणं कोणालाही आवडणार नाही. पण स्वत:ला फसवत ती गोष्ट मान्य न करणे अधिक त्रासदायक असतं.”

आणखी वाचा- बहुचर्चित ‘लाइगर’ चित्रपटाबद्दल अभिनेता, समीक्षक केआरकेने केली वेगळीच भविष्यवाणी!

आशिया कपमधील कालच्या भारत-पाकिस्तान सामन्यामध्येही विराटला हवी तशी कामगिरी करता आली नाही. याआधीही विराटच्या खराब कामगिरीचे खापर अनुष्कावर फोडण्यात आले होते. २०२० मध्ये एका सामन्यादरम्यान माजी क्रिकेटपटू आणि समालोचक सुनील गावस्कर यांनी एक विधान केले होते. गावस्कर यांच्या ‘यांनी (विराट) लॉकडाऊनमध्ये फक्त अनुष्काच्या गोलंदाजीचा सराव केला.’ या विधानामुळे त्यांच्यावर टीका झाली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Krk blames anushka sharma for virat kohli bad performance and deleted tweet mrj