बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि मानुषी छिल्लरचा (Manushi Chhillar) ‘सम्राट पृथ्वीराज’ (Samrat Prithviraj) हा चित्रपट बऱ्याच वादानंतर अखेर प्रदर्शित झाला. चित्रपट प्रदर्शित होणार आणि शेवटच्या क्षणी चित्रपटाचे नाव ‘पृथ्वीराज’ वरून बदलून ‘सम्राट पृथ्वीराज’ असे करण्यात आले. चित्रपटाबाबत सोशल मीडियावर मिक्स रिव्ह्यू येत आहेत, मात्र स्वत:ला चित्रपट समीक्षक म्हणवणाऱ्या कमाल राशिद खान म्हणजेच ​​केआरकेला हा चित्रपट अजिबात आवडला नाही. त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अक्षय कुमारला लक्ष्य केले. विनोदी चित्रपटासाठी कुमार आणि चित्रपटाच्या दिग्दर्शकाला सलाम केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काही लोकांना ‘सम्राट पृथ्वीराज’ आवडला आहे, तर काही लोकांना हा चित्रपट आवडला नाही. केआरकेने या चित्रपटाला मूर्खपणा म्हणाला आहे. केआरके ट्वीट ट्वीट करत म्हणाला, “सम्राट पृथ्वीराजचा पहिला शो आणि मला सोडून थिएटरमध्ये कोणीच नाही. प्रोपगंडा हा परदेशी बाजारात काम करत नाही.”

आणखी वाचा : Ashok Saraf 75th Birthday : अशोक सराफ यांच्या नावामागची कहाणी!

आणखी वाचा : ‘रानबाजार’मुळे प्राजक्ता-तेजस्विनीला ट्रोल करणाऱ्यांना सचिन खेडेकरांनी दिलं उत्तर, म्हणाले “मराठी प्रेक्षक…”

त्यानंतर केआरकेने अक्षयवर लक्ष्य साधत आणखी एक ट्वीट केले आहे. “मला एवढेच म्हणायचे आहे की अक्षयला असा चित्रपट करायला लाज वाटली पाहिजे, जिथे त्याने आपल्या भावाच्या मुलीचे त्याच्याशी लग्न करण्यासाठी अपहरण करावे लागले. भावाची मुलगी स्वतःच्या मुलीसारखी असते आणि मुलगी तिच्या वडिलांचा आदर करत नाही. अशा गलिच्छ चित्रपटासाठी आ थू #Prithviraj!”, असे केआरके त्या ट्वीटमध्ये म्हणाला.

आणखी वाचा : कोणत्या मराठी अभिनेत्याने साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका आवडली? सचिन खेडेकर म्हणाले…

आणखी वाचा : IMDb नुसार हे आहेत भारताती टॉप ८ कॉमेडी चित्रपट, तुम्ही यापैकी कोणते पाहिलेत?

पुढे केआरेकेने आणखी एक ट्वीट केले की, “तुम्ही चित्रपट पाहून हसालच, पृथ्वीराजच्या मृत्यूवरही हसाल. इतका अप्रतिम विनोदी चित्रपट बनवल्याबद्दल दिग्दर्शकाला सलाम.”

आणखी वाचा : शाहरुखचा ‘मॉन्स्टर’ लूक असलेल्या ‘जवान’चा टीझर आला समोर

या चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत म्हणजेच सम्राट पृथ्वीराज चौहानच्या भूमिकेत आहे, तर माजी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरने या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. संजय दत्त, सोनू सूद, आशुतोष राणा या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Krk review samrat prithviraj said akshay kumar should be ashamed salute to director for comedy film dcp