बॉलिवूड अभिनेता कमाल आर खान नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. तो नेहमीच बॉलिवूड सेलिब्रिटींविषयी अनेक खुलासे करताना दिसतो. मात्र, त्या गोष्टी किती बरोबर आहे हे सांगता येणार नाही. आता केआरकेने विनोदवीर कपिल शर्मा विषयी एक खुलासा केला आहे. त्याच्या ‘द कपिल शर्मा शो’ या शोमध्ये चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी कपिल मोठी रक्कम घेतो.

केआरकेने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून हे ट्वीट केले आहे. यात त्याने एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत ” त्याच्या शोमध्ये कपिल शर्मा एका चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी तो २५ लाख रुपये घेतो” असे सांगितले आहे. तर केआरके म्हणाला, “कपिलच्या शोची टीआरपी वाढवण्यासाठी ते तिथे जातात. कपिलच्या शोमध्ये प्रमोशन करून काही होत नाही.”

आणखी वाचा : ‘अंगात आलया’ सिद्धूचा डान्स पाहून रणवीर सिंग फिदा कमेंट करत म्हणाला…

आणखी वाचा : मुलीकडे KISS मागण्यावरून अभिजित बिचुकलेवर संतापली देवोलिनाची आई, म्हणाली…

पुढे केआरके म्हणाला, “कपिल शर्मा बिचारा एक कॉमेडियन आहे. तो एक छोटासा अभिनेता आहे. तर त्याच्या शोमध्ये कोणत्या चित्रपटाचे प्रमोशन करायचे असेल तर निर्मात्यांना ५० लाख रुपये द्यावे लागतात.” पुढे केआरके म्हणाला की “तुम्हाला कळलचं असेल मी कोणत्या मोठ्या सेलिब्रिटीच्या शोबद्दल बोलत आहे.”

Story img Loader