बॉलिवूड अभिनेता कमाल आर खान हा त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. केआरके सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत केआरके कोणत्या ना कोणत्या सेलिब्रिटीला ट्रोल करताना दिसतो. यावेळी केआरकेने बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा व्हिडीओ शेअर करत त्याला लक्ष्य केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केआरकेने अक्षयचा हा व्हिडीओ त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत अक्षय आपल्या पुस्तकांमध्ये दिलेल्या इतिहासाविषयी वक्तव्य केले आहे. हा व्हिडीओ शेअर करत “तुमचे राजा-महाराजा? कसं? सर मी तुम्हाला कितीवेळा आठवण करून देऊ की तुम्ही भारतीय नाही कॅनेडियन आहात. तुम्ही भारताला तुमचा देश बोलू शकत नाही”, असे कॅप्शन दिले आहे.

आणखी वाचा : ‘रानबाजार’मुळे प्राजक्ता-तेजस्विनीला ट्रोल करणाऱ्यांना सचिन खेडेकरांनी दिलं उत्तर, म्हणाले “मराठी प्रेक्षक…”

आणखी वाचा : कोणत्या मराठी अभिनेत्याने साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका आवडली? सचिन खेडेकर म्हणाले…

दरम्यान, काय म्हणाला होता अक्षय, “आमच्या पुस्तकांमध्ये इतिहासाबद्दल फक्त दोन किंवा तीन ओळी लिहिल्या आहेत. बाकी सर्व मुघलांबद्दल लिहिले आहे, पण आपल्या राजा महाराजांबद्दल फारसे लिहिले गेले नाही”, असे अक्षय म्हणतो.

आणखी वाचा : सोनाक्षी सिन्हाला रामायणावरील या सोप्या प्रश्नाचं उत्तर देता आले नाही, बिग बी म्हणाले…

केआरकेचे ट्वीट पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केले आहे. एक नेटकरी म्हणाला, ‘शाळेत भारताचा इतिहास वाचला असता. तर आज हा असं बोलत नसता. त्याला फक्त बोलता येतं.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘तुम्हीही दुबईचे आहात.’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘एक परदेशी दुसऱ्या परदेशीला आपल्या संस्कृतीबद्दल सांगत आहे. वेडे लोक!’