अभिनेता कमाल आर खान त्याच्या वादग्रस्त आणि इतरांवरच्या थेट टीकेमुळे चर्चेत असतो. सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असलेल्या कमाल आर खानने आता खिलाडी अक्षय कुमारवर निशाणा साधला आहे. कमाल आर खान आधी नाव न घेता टीका करायला. पण आजकाल तो थेट नाव घेऊन लोकांना टोमणे मारत आहे.

केआरकेने नुकतंच अक्षय कुमारबद्दल जे म्हटलंय ते ऐकून अक्षयचे चाहते खूपच अस्वस्थ होणार आहेत. केआरकेने अक्षयच्या कॅनेडियन नागरिकत्वावरून त्याच्यावर टीका केली आहे. याआधीही अनेकदा त्याने अक्षयच्या नागरिकत्वावरून त्याला लक्ष्य केलं होतं.

What Ajit Pawar Said?
Ajit Pawar : महायुतीला बिगर मराठा मतं एकगठ्ठा मिळतील का? अजित पवार म्हणाले, “महाराष्ट्रात…”
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Narendra Modi
Narendra Modi : “आम्ही बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण केलं”, पंतप्रधान मोदींचं छ. संभाजीनगरमध्ये वक्तव्य; काँग्रेसवर टीका करत म्हणाले…
Revanth Reddy : “ते भारताचे पंतप्रधान आहेत, पण…”; तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची नरेंद्र मोदींवर गंभीर टीका!
Rahul gandhi
Rahul Gandhi : “आदिवासी अधिकाऱ्याला मागे बसवलं जातं अन्…”, नंदूरबारमध्ये राहुल गांधींचा मोठा दावा!
yogi Adityanath batenge to katenge
‘बटेंगे तो कटेंगे’, ‘एक हैं तो सेफ हैं’, योगी आदित्यनाथ यांची घोषणा
ravi rana replied to ajit pawar
“…तेव्हा ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ आठवली नाही का? आता परिणाम भोगा”; रवी राणांचं अजित पवारांना प्रत्युत्तर!

केआरकेने ट्विटमध्ये लिहिले की, “नमस्कार भाजपा सरकार, कृपया लक्षात घ्या, आमचे टॉप हिरो देशभक्त अक्षय कुमारने तीन वर्षांपूर्वी त्याचे भारतीय राष्ट्रीयत्व परत मिळवण्यासाठी कॅनेडियन नागरिकत्व सोडण्यासाठी अर्ज केला होता आणि तुम्ही त्याची कागदपत्रे आजपर्यंत पूर्ण केली नाहीत. ही अजिबात चांगली गोष्ट नाही. एक तर तो पुन्हा पूर्वीसारखं खोटं बोलत होता आणि त्याने भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज केला नव्हता?”.

यानंतर दुसरं ट्वीट करत केआरकेने गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही टीका केली. “नेता आणि अभिनेता दोघांचे आयुष्य सारखेच असते! आणि जे दिसतं तेच विकतं! त्यामुळे त्यांना कधीही गांभीर्याने घेऊ नका, तसेच मलाही. बातम्यांमध्ये राहण्यासाठी ते पब्लिसिटी स्टंट करत असतात. होय, अमित शहाजींनी म्हटल्याप्रमाणे, आम्ही लोकांमध्ये खळबळ माजवण्यासाठी काही जुमल्यांचा वापर करतो,” असं तो म्हणाला.

आणखी एक ट्विट करत केआरके म्हणाला की, “प्रिय अक्षय कुमार भाई जान, मला वाटलं तुला आठवण करून द्यावी. तुम्ही ३ वर्षांपूर्वी तुमचे भारतीय नागरिकत्व परत मिळवण्यासाठी अर्ज केला होता. मग काय झालं? भाजपा सरकार तुमचे काम करत नाही आणि हा खरच अन्याय आहे. भाऊ मला तुमच्याबद्दल पूर्ण सहानुभूती आहे.”

केआरके इथेच थांबला नाही, तर एका चित्रपटाबद्दल बोलताना त्याने लिहिले की, पीएम मोदींनी चित्रपट निर्मात्यांना “ऑपरेशन गंगा” वर चित्रपट बनवण्यास सांगितले आहे. त्यामुळे मला खात्री आहे की कॅनेडियन अक्षय कुमार लवकरच या चित्रपटाची घोषणा करणार आहे.