बॉलीवूड कलाकार दीपिका पदुकोण, अनन्या पांडे आणि सिद्धांत चतुर्वेदी यांचा ‘गहराइयां’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. काही प्रेक्षकांना हा चित्रपट आवडला आहे. खरतंर रिलेशनशिपमध्ये फसवणूकीवर आधारीत असलेली या चित्रपटाची कथा काही प्रेक्षकांना आवडलेली नाही. दरम्यान, अभिनेता, समक्षिक आणि यूट्यूबर केआरकेने चित्रपट पाहिला आहे. त्यानंतर आता त्याने त्याचे सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या चित्रपटाला प्रतिक्रिया दिली असून त्याला सॉफ्ट पॉर्न म्हटलं आहे.

केआरकेने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. “या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटात झोपडपट्टीतील एक अभिनेता करोडपतीच्या भूमिकेत दिसतं आहे. त्याच्या चेहऱ्यावर लुक्का लिहिलं आहे, तो श्रीमंत कसा होणार, काय मस्करी करतात.”

आणखी वाचा : मलायकाला मुलगा अरहान आई म्हणून नाही तर ‘या’ नावाने मारतो हाक

आणखी वाचा : “मी उघड्यावर शौचाला बसलो आणि मागे वळून पाहतो तर हॉलिवूडचे…”, करण जोहरने सांगितला ‘तो’ लाजिरवाणा किस्सा

या व्यतिरिक्त केआरकेने दीपिका पदुकोण विषयीही खूप वाईट कमेंट केली आहे. ‘गहराइयां’ला दीपिका पदुकोणची बायोग्राफी म्हणायला हरकत नाही कारण तिला फक्त पैसा आणि मज्जा करायला आवडते, असे केआरके म्हणाला. त्यानंतर आणखी एक ट्वीट करत चित्रपटाच्या डायलॉग्सवर प्रतिक्रिया दिली आहे. “या चित्रपटात किती अप्रतिम डायलॉग्स आहेत, आजपर्यंत माझ्या आयुष्यात ऐकलेले सगळ्यात चांगले डायलॉग्स, कारण आणि लाज यांचा काहीही संबंध नाही”, असे केआरके म्हणाला.

आणखी वाचा : अभिनेत्री रवीना टंडनच्या वडिलांचे निधन

आणखी वाचा : “अपमानानंतरही अक्षय कुमार जर कपिल शर्मा शोमध्ये आला तर मी…”, अभिनेत्याचे ट्वीट चर्चेत

तर आणखी एक ट्वीट करत केआरकेने ‘गहराइयां’ या चित्रपटाला सॉफ्ट पॉर्न म्हटलं आहे. हे पहिल्यांदा झालं नाही की केआरकेने कोणत्या चित्रपटावर अशा कमेंट केल्या आहेत. या आधी केआरकेने सुपरस्टार सलमान खानच्या ‘राधे’ या चित्रपटावर ही अशीच काही प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर केआरकेने सलमान खानवर कोणत्या चित्रपटाचा रिव्ह्यू लिहिला नाही.

Story img Loader