बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या वाढदिवसाच्या एक दिवसाआधी त्याला सर्पदंश झाल्याची घटना समोर आली. सलमानच्या पनवेलवरील फार्महाऊसवर ही घटना घडली. वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी तो पनवेलच्या फार्महाऊसवर गेला असताना हा अपघात झाला. यानंतर रात्री उशिरा सलमान खानला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर सलमान खानला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. या संपूर्ण प्रकरणानंतर अभिनेता कमाल आर खान याने निशाणा साधला आहे.

बॉलिवूड अभिनेता कमाल आर खान त्याच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. केआरके सोशल मीडियावर नेहमी त्याचे मत मांडताना दिसतो. केआरकेने नुकतंच सलमान खानचे नाव न घेता आक्षेपार्ह कमेंट केली आहे. केआरकेने त्याच्या अधिकृत ट्विटरवर ट्वीट केले आहे. यावर तो म्हणाला, “सापाने त्याचे काम बरोबर केले होते. पण तो बिचारा स्वत: मेला. कारण समोरच्यामध्ये विषचं इतके जास्त होते.”

दरम्यान यापूर्वीही केआरकेने सलमान खानवर आक्षेपार्ह कमेंट्स केल्या होत्या. त्यानंतर सलमान खानच्या टीमने त्याच्या विरोधात कायदेशीर नोटीस पाठवली होती. याप्रकरणी कोर्टाने फटकारल्यानंतर केआरकेने वचन दिले होते की तो कधीही सलमान खानच्या कोणत्याही चित्रपटाचा रिव्ह्यू करणार नाही किंवा त्याच्याविरोधात कोणतीही आक्षेपार्ह टिप्पणी करणार नाही. पण नुकतंच घडलेल्या प्रकरणानंतर केआरकेने पुन्हा सलमानविरोधात आक्षेपार्ह कमेंट केली आहे. त्यामुळे त्याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

“…त्याने तीन वेळा मला दंश केला”, सर्पदंशानंतर सलमान खानची पहिली प्रतिक्रिया

दरम्यान काल (२७ डिसेंबर) अभिनेता सलमान खानचा वाढदिवस आहे. रात्री उशिरा त्याने पनवेल येथील त्यांच्या फार्म हाऊसवर वाढदिवस साजरा केला. रविवारी सलमान खानला साप चावला होता, त्यानंतर यावेळेस तो वाढदिवस साजरा करणार नाही अशी प्रतिक्रिया समोर येत होत्या. मात्र त्याची प्रकृती सुधारत आहे. त्यानंतर रात्री सलमानने आपला वाढदिवस कुटुंबातील सदस्य आणि मित्रांसोबत साजरा केला.

Story img Loader