बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीच्या ‘मधुबन में राधिका नाचे’ या नव्या गाण्याने खळबळ उडवून दिली आहे. कधी तिचे पुतळे जाळले जात आहेत, तर यावर सर्वसामान्यांनी सुद्धा या गाण्याच्या बोलावर आक्षेप घेतला आहे. दरम्यान, नेहमीच वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असलेला अभिनेता केआरकेने सनीवर निशाणा साधत बॉलिवूड सेलिब्रिटींना घेरले आहे. केआरकेने सनीच्या भूतकाळाचा संदर्भ देत म्हटले की ती पॉर्न इंडस्ट्रीतून चित्रपटात आली आणि तरीही इंडस्ट्रीने तिला पाठिंबा दिला.
सनीच्या या नवीन गाण्यावर अनेक धार्मिक मंडळींनीही आक्षेप घेतला आहे. हे गाणं हिंदू धर्माच्या भावना दुखावल्याचे म्हटले जात आहे. यासोबतच सनीच्या डान्सलाही अश्लील म्हटले जात आहे. आता केआरकेने यूट्यूबवर एक व्हिडिओ पोस्ट करून या प्रकरणी आपले मत मांडले आहे. व्हिडिओचे शीर्षक, ‘सनी लिओनीने केला हिंदू धर्माचा अपमान?’ व्हिडिओमध्ये, केआरके बॉलीवूडच्या दिग्गजांवर निशाना साधला आहे आणि म्हणाला “की त्यांनी एका पॉर्न स्टारला इंडस्ट्रीचा मोठा स्टार बनवलं आहे. इतकंच नाही तर सनीचं यशस्वी करिअर पाहून पूनम पांडे आणि शर्लिन चोप्रासारखे लोकही अॅप्सवर पॉर्न व्हिडिओ सर्व्ह करत असल्याचं व्हिडीओमध्ये”, केआरके म्हणाला आहे.
केआरकेने या व्हिडीओमध्ये महेश भट्ट, एकता कपूर आणि शाहरुख खानचं नावं घेतलं आणि आरोप लावला आहे की त्याने सनीची मार्केटिंग केली आहे. खरतरं सनीने शाहरुखने रईजच्या लैला मैं लैला या गाण्यावर आयटम डांस केला होता.
आणखी वाचा : ‘तुमचा धर्म इतरांवर लादणे बंद करा’, उर्फीची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
केआरके पुढे म्हणाला, ‘भट्ट साहेब आणि एकता कपूर अशा मुली शोधत आहेत जे नग्न होण्यास तयार आहेत… सर्व बॉलीवूडच्या लोकांनी सनीला प्रमोट करायला सुरुवात केली. शाहरुखनेही सनीला आपल्या चित्रपटात घेतले आणि इतरांनीही सनीला देवी म्हणून घोषित केले. व्हिडिओमध्ये केआरकेने प्रेक्षकांना शिवीगाळ केलं आहे. सनीला देवीसारखं सांगणार्या मीडियाच्या मागे लोक मन लावत नाहीत आणि आंधळेपणाने फॉलो करत आहेत”, असं तो म्हणाले.