हृतिकच्या ‘क्रिश ३’ चित्रपटाच्या ट्रेलरसाठी त्याचे सगळेच चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. पण, तोपर्यंत त्याच्या चाहत्यांसाठी या चित्रपटातील रघुपती राघव गाण्याचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. या १५ सेकंदाच्या व्हिडीओमध्ये हृतिकने नेहमीप्रमाणे त्याच्या डान्समधून आश्चर्यित करणारे डान्समूव्हज दाखविले आहेत. तरी, पूर्ण व्हिडीओसाठी अद्याप थोडी प्रतिक्षा करण्याची गरज आहे. हे एक पार्टीयुक्त गाणे आहे. या टीजरला आतापर्यंत कालपासून चार लाखांच्यावर लाइक्स मिळाले आहेत.
राजेश रोशन यांनी संगीत दिलेले रघुपती राघव गाणे नीरज श्रीधर, मोनाली ठाकूर आणि बॉबने गायले आहे. हृतिकव्यतिरीक्त प्रियांका चोप्रा, कंगना आणि विवेक ऑबरॉय यांच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.

Story img Loader