सुपरहिरो हृतिकच्या ‘क्रिश ३’ चित्रपटाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. दिग्दर्शक राकेश रोशन यांनी ४ नोव्हेंबर (सोमवार) म्हणजेच धनत्रयोदशी दिवशी चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले आहे.
धनत्रयोदशीचा मुहुर्त शुभ असल्याने ‘क्रिश ३’ शुक्रवारऐवजी सोमवारी ४ नोव्हेंबरला प्रदर्शित होत असल्याचे सांगण्यात येत आहे. नुकतीच राकेश रोशन यांनी चित्रपटाची तारीख जाहीर केली आहे. तसेच, दिवाळीची चार दिवस सुट्टी असल्याने जास्तीत जास्त लोक चित्रपटगृहाकडे खेचले जाऊन चित्रपटाला याचा फायदा होईल.

Story img Loader