क्रिश ३’चे निर्माता राकेश रोशन त्यांच्या या चित्रपटाचा ट्रेलर रोहित शेट्टीच्या ‘चेन्नई एक्सप्रेस’ चित्रपटाबरोबर प्रदर्शित करण्याचा विचार करत आहेत. काही दिवसांपूर्वीच ‘चेन्नई एक्सप्रेस’चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण यांनी अभिनय केलेला ‘चेन्नई एक्सप्रेस’ ८ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. या मोठ्या चित्रपटासोबत जर ‘क्रिश ३’चा ट्रेलर प्रदर्शित केला तर अधिक प्रक्षेकांचे लक्ष वेधता येईल असे मत दिग्दर्क आणि निर्माता राकेश रोशन यांनी व्यक्त केले. यासाठी शाहऱुख आणि यूटीव्ही यांसोबत चर्चा करणार असल्याचेही ते म्हणाले.
क्रिश ३मध्ये हृतिक, प्रियांका चोप्रा, विवेक ऑबेरॉय आणि कंगना राणावत यांच्या मुख्य भूमिका आहेत. ‘कोई मिल गया’ आणि ‘क्रिश’चा सिक्वल असलेला हा चित्रपट दिवाळीमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader