कॉमेडियन आणि अभिनेता कृष्णा अभिषेकने कॉमेडी शो आणि बॉलीवूडमधील काही चित्रपटांतील त्याच्या भूमिकांमुळे प्रसिद्ध आहे . त्याची बहीण आरती सिंगदेखील टीव्हीवरील नावाजलेल्या अभिनेत्रींपैकी एक आहे. आरती ही कृष्णाची धाकटी बहीण आहे. कृष्णाने नुकतेच एका व्लॉगमध्ये हे सांगितले की आरतीच्या जन्मानंतर तब्बल अनेक वर्षांनी त्याला कळले की त्याला एक बहीण आहे. कृष्णाने लहानपणी पहिल्यांदा आरतीला भेटण्याचा प्रसंग सांगितला.
अर्चना पूरन सिंगच्या अलीकडील व्लॉगमध्ये, कृष्णा अभिषेकने पहिल्यांदा आरतीला भेटल्याच्या आठवणी सांगितल्या. दुर्दैवाने, आरतीचा जन्म झाल्यानंतर काही काळातच त्यांच्या आईचे गर्भाशयाच्या कर्करोगामुळे निधन झाले. कृष्णाने सांगितले की, त्याचे मामा गोविंदाची वहिनी आरतीला लखनऊला घेऊन गेल्या होत्या, त्यामुळे त्याला बराच काळ माहितीच नव्हते की त्याला एक बहीण आहे.
हास्याच्या दुनियेतील या कलाकाराने पुढे सांगितले की, तो ७-८ वर्षांचा असताना आरतीला पहिल्यांदा भेटला. कृष्णाने म्हणाला की , “मी तातडीने कुटुंबाच्या मदतीने फ्लाइटचे तिकीट काढले आणि रक्षाबंधनाला तिला भेटण्यासाठी प्रवास केला. ती फक्त ५-६ वर्षांची होती, आणि आम्ही पहिल्यांदा एकमेकांना पाहिले. त्यानंतर, आमचे नाते अतूट झाले.”
कृष्णा आणि आरती हे भावंड मनोरंजन क्षेत्रातील मोठी नावे आहेत. कृष्णाला ‘कॉमेडी सर्कस’, ‘द कपिल शर्मा शो’, ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ यांसारख्या रिअॅलिटी शोमुळे मोठी प्रसिद्धी मिळाली. तसेच त्याने ‘बोल बच्चन’, ‘एंटरटेनमेंट’ यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केले आहे. तो त्याच्या विनोदी शैलीसाठी प्रसिद्ध आहे.
दुसरीकडे, आरती सिंग ही टीव्ही इंडस्ट्रीतील नावाजलेल्या अभिनेत्रींपैकी एक असून तिने ‘परिचय’, ‘उतरन’, यांसारख्या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती. ती ‘बिग बॉस १३’ च्या पर्वात देखील सहभागी झाली होती.