कॉमेडीयन कपिल शर्माचा लोकप्रिय ‘द कपिल शर्मा शो’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सोशल मीडियावर या शोची जोरदार चर्चा आहे. पण काही प्रेक्षक मात्र या शोसाठी फारसे खुश नसल्याचं चित्र आहे. याचं कारण म्हणजे या शोमध्ये आता कृष्णा अभिषेक दिसणार नाहीये. जेव्हा हे वृत्त समोर आलं त्यानंतर सोशल मीडियावर याबाबत उलट सुलट चर्चांना उधाण आलं आहे. पण या चर्चांना आता स्वतः कृष्णा अभिषेकनेच पूर्णविराम लावला आहे. कृष्णाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा शो सोडण्यामागचं कारण स्पष्ट केलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कृष्णा अभिषेक ‘द कपिल शर्मा शो’मध्ये दिसणार नाही म्हटल्यावर सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या होत्या. एकीकडे कपिल शर्मा आणि कृष्णा यांच्यात वाद सुरू आहेत असं बोललं जात होतं तर दुसरीकडे कृष्णा अभिषेकनं कमी मानधन मिळत असल्याने शो सोडल्याच्या चर्चाही सुरू झाल्या होत्या. पण आता यावर स्वतः कृष्णा अभिषेकनेच प्रतिक्रिया दिली आहे.
आणखी वाचा- Video : ‘रुख से जरा..’ निधनाआधी सोनाली फोगाट यांनी शेअर केलेली ‘ती’ पोस्ट ठरली अखेरची!

नुकतंच एका न्यूज पोर्टलशी बोलताना कृष्णा अभिषेक म्हणाला, “निर्मात्याशी कॉन्ट्रॅक्टसंबंधी काही समस्या असल्याने हा शो सोडावा लागतोय. जेवढं प्रेक्षक मला मिस करणार आहेत तेवढंच मी देखील त्यांना करणार आहे. त्यांच्या प्रेमामुळेच मी आज या ठिकाणी आहे. प्रेक्षकांनी मला भरभरून प्रेम दिलंय.”

आणखी वाचा-सर्वांसमोर कपिलने केली ‘कॉफी विथ करण’ शोची थट्टा, उतरला होता करण जोहरचा चेहरा

याशिवाय या शोच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कपिल शर्मा आणि कृष्णा अभिषेक यांच्यात कोणतेही मदभेद नाहीत. दोघंही एकमेकांचा खूप आदर करतात. मात्र निर्माते आणि कृष्णा यांच्यात मानधनाच्या मुद्द्यावरून काही समस्या आहेत. दोन्ही बाजूंनी या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात आलेत. पण यात त्यांना यश आलेलं नाही. मानधनाच्या मुद्द्यावर कृष्णा अभिषेकला या शोमधून बाहेर पडावं लागलं आहे. मात्र याचा कपिल शर्माशी काहीच संबंध नाही. त्यांच्यातील वादाची वृत्तं फक्त अफवा आहेत. स्वतः कपिल शर्मा देखील एक ठराविक रक्कम मानधन म्हणून घेत असतो. तो या शोचा निर्माता नाहिये. त्यामुळे त्याचा या प्रकरणाशी काहीच संबंध नाही.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Krushna abhishek left the kapil sharma show know the reason mrj