बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि त्याचा भाचा कृष्णा अभिषेक गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यामध्ये सुरु असलेल्या वादामुळे चांगलेच चर्चेत आले आहेत. यातच अनेकदा गोविंदाची पत्नी सुनिता आणि कृष्णाची पत्नी कश्मिरा यांच्यातही टोलेबाजी सुरु असते. नुकतच कृष्णा आणि कश्मिराला स्पॉट करण्यात आलं होतं. यावेळी पुन्हा एकदा कश्मिराने गोविंदाची पत्नी सुनिता आहुजावर निशाणा साधला आहे.
कृष्णा अभिषेक आणि कश्मिरा शाहला नुकतच मुलासोबत स्पॉट करण्यात आलं होतं. यावेळी त्यांना गोविंदासोबत सुरु असलेल्या वादाबद्दल विचारण्यात आलं. यावेळी कश्मिरा सुनिता आहुजावर निशाणा साधत म्हणाली,”गोविंदा खूप चांगले कलाकार आहेत. एक अभिनेता म्हणून मला ते आवडतात. याशिवाय मी दुसरं कुणाला ओळखत नाही. मॅनेजर्सबद्दल मी काही बोलत नाही.” असं ती म्हणाली. २०१६ सालापासूनच कश्मिरा आणि सुनिता आहुजा यांच्यात वाद सुरु आहेत.
काळ्या रंगाच्या साडीत खुललं अमृता खानविलकरच सौंदर्य
‘या’ कारणासाठी कपिल शर्माला बंद करावा लागला होता शो, केला ‘त्या’ गोष्टीचा खुलासा
गोविंदाची पत्नी सुनिताने कश्मिराने गोविंदाची थट्टा केल्याचं म्हंटलं होतं. गोविंदा पैशांसाठी काम करतात असं कश्मिरा म्हणाली असल्याचा समज सुनिता यांचा झाला होता. तर दुसरीकडे मुलगा आजारी असतानाही गोविंदा आणि सुनिता मुलाला पाहायला देखील आले नाहित असा आरोप कश्मिराने केला होता.
तर नुकत्याच झालेल्या कपिल शर्माच्या शोमध्ये गोविंदा आणि सुनिताने हजेरी लावली होती. मात्र या खास भागात शोचा हिस्सा असूनही कृष्णा अभिषेकने परफॉर्म करणं टाळलं होतं.