Samantha-Naga Chaitanya Divorce Konda Surekha Blames KTR : दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू व तिचा पूर्वाश्रमीचा पती नागा चैतन्य सध्या चर्चेचा विषय बनले आहेत. कारण तेलंगणामधील एका काँग्रेस नेत्याने या दोघांच्या घटस्फोटाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. काँग्रेस नेत्या आणि तेलंगणाच्या पर्यावरण तथा वनमंत्री कोंडा सुरेखा यांनी माजी मंत्री व बीआरएसचे कार्यकारी अध्यक्ष के. टी. रामा राव उर्फ केटीआर यांचा समांथा व नागा चैतन्यच्या घटस्फोटाशी संबंध असल्याचा दावा केला आहे. कोंडा सुरेखा यांनी केटीआर यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. या घटस्फोटामागे केटीआर यांचाच हात असल्याचा दावा सुरेखा यांनी केला आहे.

कोंडा सुरेखा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना सांगितलं की “केटीआर यांनी अनेक जोडप्यांना विभक्त केलं आहे. त्यामध्ये समांथा व नागा चैतन्य या जोडप्याचाही समावेश आहे. केटीआर यांनी अनेकांना चित्रपटसृष्टी सोडण्यास भाग पाडलं आहे”. यासह सुरेखा यांनी केटीआर यांच्यावर आरोप केला आहे की ते ड्रग्जचं सेवन करतात.

हे ही वाचा >> Photos : एकेकाळी दिवसभरात एकदाच मिळायचं जेवण ते आज आहे टॉपची साऊथ अभिनेत्री; वाचा समांथाचा संघर्षमय प्रवास

नागार्जुनची संतप्त प्रतिक्रिया

दरम्यान, कोंडा सुरेखा यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर अभिनेता नागार्जुन याने समाजमाध्यमांवर एक पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्याची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. नागार्जुन याने या पोस्टद्वारे तेलंगणा सरकारमधील मंत्री कोंडा सुरेखा यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. अभिनेता म्हणाला “मी कोंडा सुरेखा यांच्या वक्तव्याचा निषेध करतो. त्यांनी इतरांच्या, चित्रपट कलाकारांच्या खासगी आयुष्याचा सन्मान करावा. राजकीय टिका-टिप्पणी करण्यासाठी चित्रपट कलाकारांच्या खासगी आयुष्याचा वापर करू नये. आमच्या कुटुंबाबद्दल तुम्ही (सुरेखा) केलेल्या टिप्पण्या व आरोप चुकीचे आहेत. तुम्ही वापरलेले शब्द मागे घ्यायला हवेत”.

हे ही वाचा >> “आम्ही तेलुगू चित्रपटसृष्टीतील महिला…”, समांथा रुथ प्रभूची हेमा कमिटीच्या अहवालावर प्रतिक्रिया; म्हणाली, “लैंगिक छळावर…”

समांथा-चैतन्यचा चार वर्षांत घटस्फोट

नागा चैतन्य व समांथा यांनी २०१७ साली लग्न केलं होतं. परंतु, त्यांचा संसार फार काळ टिकला नाही. २०२१ मध्ये या जोडप्याने घटस्फोट घेतला. त्यानंतर दोन वर्षांनी नागा चैतन्य याने दुसरं लग्न केलं. गेल्या महिन्यात ८ ऑगस्ट रोजी त्याने अभिनेत्री शोभिता धुलिपाला हिच्याबरोबर साखरपुडा केला आहे. हे जोडपं लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.

Story img Loader