‘सेक्रेड गेम्स’ या वेब सीरिजने प्रेक्षकांची मने जिंकली. या सीरिजमध्ये असलेल्या प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात छाप सोडली. त्यापैकी एक भूमिका म्हणजे अभिनेत्री कुब्रा सैतनची भूमिका. कुब्राने सीरिजमध्ये कुक्कूची भूमिका साकारली होती. ही भूमिका एका तृतियपंथी स्त्रीची होती. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत, कुब्राने नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत इंटिमेट सीन शूट करतानाचा अनुभव सांगितला आहे.

कुब्राने नुकतीच एका न्यूज पोर्टलला मुलाखत दिली होती. यात तिने सांगितले की इंटिमेट सीनला सात वेळा शूट करण्यात आले होते. कारण दिग्दर्शक अनुराग कश्यपला ते सीन सात वेगवेगळ्या अॅंगलने हवे होते. या सीनसाठी अनुरागने सगळ्या गोष्टी थांबल्या होत्या जेणेकरून संपूर्ण लक्ष हे त्या सीनवर असेल.

आणखी वाचा : आयुषमान खुराना चुकून प्यायला होता बाळासाठी काढलेले ब्रेस्ट मिल्क, पत्नी ताहिराने सांगितला ‘तो’ किस्सा

कुब्रा पुढे म्हणाली, जेव्हा ती सातव्यांदा सीन शूट करत होती तेव्हा ती अस्वस्थ होती. त्यावेळी ती खूप भावूक झाली. त्यानंतर तिचा सहकलाकार नवाजुद्दीन तिच्याकडे आला आणि त्याने तिचे आभार मानले. नवाजुद्दीनने सांगितले की, तो तिला बाहेर भेटेल. तेव्हा तिला कळले की सीन संपला आहे. त्यानंतर “मी रडू लागले आणि जमिनीवर पडले. मी रडत राहिले आणि रडतच राहिले. नवाजुद्दीन म्हणाला, “मला वाटतं तू बाहेर जावं, कारण माझा सीन अजून बाकी आहे.” मी म्हणाले, “त्यांची एंट्री बाकी आहे.”

आणखी वाचा : जात लपवण्यासाठीच वडिलांनी स्वीकारलं ‘बच्चन’आडनाव, अमिताभ यांचा खुलासा

कुब्राने बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या ‘रेडी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात तिची छोटी भूमिका होती. मात्र, कुब्राला खरी लोकप्रियता ही ‘सेक्रेड गेम’ या वेबसीरिजमधून मिळाली. यानंतर तिने ‘जवानी जानेमन’ या चित्रपटात काम केले होते.

Story img Loader