अभिनेता कुणाल खेमूने आपल्या उजव्या पायावर भगवान महादेवाचा टॅटू गोंदवून घेतला आहे. अभिनेत्री सोहा अली खान या त्याच्या प्रेयसीबरोबर काही दिवसांपूर्वी त्याचा साखरपुड्याचा कार्यक्रम पार पडला. टॅटूची झलक दाखविणारे छायाचित्र त्याने टि्वटरवर पोस्ट केले असून, छायाचित्राबरोबरच्या संदेशात तो म्हणतो, बऱ्याच काळाच्या विलंबानंतर बुद्ध समुदायाच्या पारंपरिक शैलीतील बांबूच्या काठीद्वारे टॅटू गोंदवून घेतला… माझा पहिला टॅटू. महादेवाचा रुद्र अवतार या टॅटूमध्ये साकारण्यात आला आहे. सध्या कुणाल ‘भाग जॉनी’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा