‘लिहून ठेव तू, एलपी आणि आरडीसारखे संगीतकार कुमार शानूला कधीच गाणी देणार नाहीत..’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
कुमार शानूवर विशेष प्रेम असणारा माझा एक मित्र तावातावाने बोलत होता. कारणही तसंच होतं, आराधनानंतर कोणत्याही नायकाने गाण्यासाठी तोंड उघडल्यावर ज्याप्रमाणे किशोरकुमारचाच आवाज ऐकू यायचा तीच गत आशिकीनंतर झाली होती. (ही तुलना एवढय़ापुरतीच) नवीन पिढीतल्या नायकांसाठी गात होता केवळ कुमार शानू. कुठेही गेलं तरी त्याचीच गाणी कानावर पडत होती. किशोरकुमारची नक्कल करण्याचा प्रयत्न आणि नदीम-श्रवणची एकसुरी गाणी (जी आता आजच्या गाण्यांपेक्षा कितीतरी सुसह्य़ वाटतात.) यामुळे कुमार शानू काही वेळा असह्य़ होत असे. याच उद्वेगातून आमच्या मित्राने ही भविष्यवाणी केली होती. काळाचा महिमा असा की त्याचं हे भाकीत खोटं ठरलं. लक्ष्मीकांत-प्यारेलाल आणि पंचमच काय हृदयनाथ मंगेशकरांकडेही कुमार शानू गायला.
लक्ष्मीजींनी त्यांच्या मुलासाठी म्हणजे ऋषीकेशसाठी काढलेल्या दिलबर (१९९४) या सिनेमात कुमार शानू आणि अलका याज्ञिकचं एक सुंदर युगुलगीत आहे.. मेरे दिल में लगे है ओ सनम तेरे प्यार के मेले, जीना है संग तेरे मुझे जीना नही अकेले… त्याच वर्षी आलेल्या १९४२ अ लव्ह स्टोरीमध्ये पंचमची किमया पुन्हा अनुभवता आली. यातल्या ‘कुछ ना कहो, एक लडकी को देखा तो, रिमझीम रिमझीम, रुठ न जाना’ या गाण्यांत कुमार शानूचा आवाज किती खुलून आलाय, हे वेगळं सांगायला नको. (ही गाणी गाण्यासाठी सोनू निगमही उत्सुक होता, पंचमला मात्र ती अमितकुमारकडून गाऊन घ्यायची होती…) या दोन सिनेमांच्या आधीच मंगेशकरांकडेही शानू गायला. ते गाणं म्हणजे माया मेमसाबमधलं ‘एक हसीं निगाहका दिलपे साया है..’
तर, सांगायचा मुद्दा हा की नव्वदच्या दशकात कुमार शानू ऐन भरात होता. अर्थात, त्याचं स्ट्रगल सुरू झालं ते १९७९पासून. त्याचे वडील पशुपतीनाथ भट्टाचार्य हे कोलकात्यातील गायक व संगीतकार. त्यांनी शानूला गाण्याचं प्राथमिक शिक्षण दिलं. शानू तबलाही शिकला. शानूचं खरं नाव केदारनाथ आहे, हे समजल्यावर अनेकांना गंमत वाटेल, परंतु हे खरं आहे. स्टेज शो करणाऱ्या शानूला हेरलं ते दिवंगत गझल गायक जगजित सिंग यांनी. त्यांनी आंधिया सिनेमामध्ये त्याला एक गाणं दिलं, शिवाय कल्याणजी-आनंदजी यांच्याशी परिचय करून दिला. कल्याणजी-आनंदजी यांनी त्याला जादूगर या सिनेमासाठी गायची संधी दिली. ते गाणं होतं, म जादूगर है मेरा नाम गोगा..या संगीतकार बंधूंनी त्याला केवळ गाणंच दिलं नाही, तर त्यांचं बारसंही केलं. किशोरकुमारमधील कुमार हे नाव उचलून त्यांनी त्याला कुमार शानू हे नाव दिलं.
१९९०मध्ये आलेल्या आशिकीमुळे शानूचं नशीब फळफळलं. महेश भटच्या या सिनेमातली गाणी खूपच गाजली. या सुमारास व त्यानंतरही िहदी सिनेमासृष्टीत कोणाची भाईगिरी चालत होती, हे उघड गुपीत आहे. शानूच्या (आणि नदीम-श्रवण, अनू मलिक, शाहरुख खान आदी अनेकांच्या) कारकीर्दीला या भावकीने हात दिला, असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. शानूच्या नावावर नवेनवे विक्रम होत गेले. एकाच दिवसात २८ गाणी ध्वनीमुद्रित करणं असो किंवा १९९१ ते १९९५ असे ओळीने पाच फिल्मफेअर पुरस्कार (अब तेरे बिन, मेरा दिलभी कितना पागल है, सोचेंगे तुम्हे प्यार, ये काली काली आँखे आणि एक लडकी को देखा तो) जिंकणं असो, त्याचाच बोलबाला होता. मात्र उत्पत्तीनंतर विलय हा तर निसर्गनियम. नव्या सहस्रकात तो मागे पडला. नदीम-श्रवण परवडले, अशी गाणी नवे तथाकथित संगीतकार देऊ लागले आणि शानूही कालबाह्य़ ठरला. त्याच्यासाठी समाधानाची गोष्ट म्हणजे यशराज फिल्म्सच्या ‘दम लगाके हैशा’ या आगामी सिनेमातला नायक (आयुष्मान खुराणा) त्याचा चाहता दाखवलाय. यात त्याने श्रेया घोषाल व नीती मोहन या गायिकांसोबत दोन गाणीही गायलीत आणि यात तो पाहुणा कलाकार म्हणूनही चमकलाय. सध्याची नवी पिढी शानूच्या आवाजाची ‘आशिक’ होते का ते पाहायचं!
..म्हणून गाणं कमी केलं
गेल्या काही वर्षांत गाण्यांचा दर्जा खूपच खालावलाय. मी ज्या प्रकारची गाणी गायचो आणि मला जशी गाणी आवडत असत, तशी गाणी होणं कमी होत गेल्याने गाण्यांच्या निवडीबाबत मी खूप चोखंदळ झालो. अनेक गाणी मी नाकारली. बदलाचं हे चक्र सुरूच असतं, हिप-हाँप, पाँप हे प्रकार मागे पडून आता पुन्हा मेलडीचा जमाना येतोय. येणाऱ्या काळात तुम्हाला पुन्हा ‘तो’ कुमार शानू ऐकायला मिळेल.