सध्या आपल्याला अनेक बायोपिक पाहायला मिळत आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रेक्षक आता बायोपिक पाहायला पसंती देतात. आता पर्यंत आपण अनेक खेळाडूं आणि स्वातंत्र्यसैनिकांवर बायोपिक पाहिल्या आहेत. एवढचं काय तर अजूनही काही बायोपिक येणार असून त्याच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. दरम्यान, आता २५० पेक्षा जास्त मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम करणारे निळू फुले यांची बायोपिक लवकरच येणार आहे. कुमार तौरानी या बायोपिकवर काम करणार असून याच वर्षी त्याच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. एवढचं काय तर त्यांनी निळू यांची लेक गार्गीकडून या चित्रपटासाठीचे राईट्स देखील घेतले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या बातमी विषयी कुमार म्हणाले, “होय, आम्ही त्यांची मुलगी गार्गी फुले यांच्याकडून निळू फुले यांच्यावर बायोपिक बनवण्याचे अधिकार घेतले आहेत. एवढचं काय तर या वर्षीच या प्रोजेक्टवर काम सुरू करण्याचा विचार करत आहोत.” या चित्रपटात आता कोणाला कास्ट करणार हे त्यांनी अजुन काही उघडपणे सांगितले नाही. चित्रपटाच्या कथे विषयी सांगायचं तर, या बायोपिकमध्ये निळू हे एक अभिनेता स्वातंत्र्यसैनिक आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून आपल्याला त्यांचे जीवन कसे होते ते पाहायला मिळणार आहे.

आणखी वाचा : अभिनेत्रीने हॉटेलमध्ये केली चोरी? टीना दत्ताचे कृत्य कॅमेऱ्यात झाले कैद

आणखी वाचा : Bigg Boss 15 : ‘बिचुकले पुरुषी अहंकारी अन्…’, शमिताने शो सोडण्याची व्यक्त केली इच्छा

निळू हे मराठी चित्रपटसृष्टी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतल एक अष्टपैलू कलाकार आहेत. ‘कथा अकलेच्या कांद्याची’ या मराठी नाटकातून त्यांनी आपल्या त्यांच्या करिअरची सुरुवात केली. १९५६ मध्ये आलेल्या ‘एक गाव बारा भानगडी’पासून सुरू झालेल्या अनेक चित्रपटांमध्येही त्यांनी काम केले आहे. निळू यांनी ‘कुली’ या चित्रपटात अमिताभ बच्चन, ‘मशाल’मध्ये दिलीप कुमार आणि ‘सारांश’मध्ये अनुपम खेर यांच्यासोबत हिंदी चित्रपटातही काम केले आहे. ते पडद्यावरच्या खलनायकी भूमिकेसाठी ओळखला जात होते. वास्तविक जीवनात त्यांनी समाजाच्या भल्यासाठी कामे केली. निळू फुले यांचे २००७ मध्ये वयाच्या ७८ व्या वर्षी निधन झाले.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kumar taurani to develop bio pic on marathi actor nilu phule acquires rights from nilu phule s daughter dcp