आम आदमी पक्षाचे नेते आणि लोकसभा निवडणूकीत अमेठी मतदारसंघात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना आव्हान दिलेले कुमार विश्वास यांना प्रसिद्ध रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’मध्ये सहभागी होण्यासाठी पाच कोटींची ऑफर देण्यात आली आहे.
आम आदमी पक्षाच्या माध्यमातून कुमार विश्वास नेहमी चर्चेचा विषय राहीले आहेत. विश्वास यांना लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांच्याविरोधात पराभवाला समोरे जावे लागले होते. निवडणूकीत त्यांची अनामत रक्कमही जप्त झाली होती. तरीसुद्धा निवडणूकीत थेट राहुल गांधींवर शेलक्या शब्दांत टीका करणाऱयांमध्ये कुमार विश्वास अग्रेसर राहीले होते. सोशल नेटवर्कींगवर ट्विटरच्या माध्यमातूनही कुमार विश्वास आपल्या कवितांच्या माध्यमातून सरकारवर टीकास्त्र करताना पहायला मिळाले आहेत.
आता ‘बिग बॉस’ या ‘रिआलिटी शो’च्या प्रस्तावामुळे पुन्हा एकदा कुमार विश्वास चर्चेचा विषय झाले आहेत. परंतु, या प्रस्तावावर कुमार विश्वास यांनी अजून तरी कोणतीही अधिकृत भूमिका मांडलेली नाही.
कुमार विश्वास यांना ‘बिग बॉस’साठी ५ कोटींची ऑफर!
आम आदमी पक्षाचे नेते आणि लोकसभा निवडणूकीत अमेठी मतदारसंघात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना आव्हान दिलेले कुमार विश्वास यांना प्रसिद्ध रिअॅलिटी शो 'बिग बॉस'मध्ये सहभागी होण्यासाठी पाच कोटींची ऑफर देण्यात आली आहे.
First published on: 22-07-2014 at 04:00 IST
TOPICSकुमार विश्वास
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kumar vishwas gets rs 5 cr offer for big boss