कवी कुमार विश्वास हे त्यांच्या कवितांबरोबरच स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखले जातात. ते अनेक सामाजिक व राजकीय विषयांवर आपली मतं मांडत असतात. आता त्यांचं असंच एक वक्तव्य चर्चेत आलं आहे. काही दिवसांपूर्वी मुकेश खन्ना यांनी सोनाक्षी सिन्हावर रामायणातील एका प्रश्नाचं उत्तर न आल्याबद्दल टीका केली होती. पाच वर्षे जुना मुद्दा पुन्हा समोर आणल्याबद्दल सोनाक्षीने त्यांना सुनावलं होतं. त्यानंतर तो विषय फक्त उदाहरण म्हणून बोलल्याचं स्पष्टीकरण खन्ना यांनी दिलं होतं. याच दरम्यान, कुमार विश्वास यांना एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत ते लोकांना त्यांच्या मुलांना रामायण शिकवण्याचा सल्ला देत आहेत.

डॉ. कुमार विश्वास यांनी नुकतीच मेरठ महोत्सवात हजेरी लावली होती. येथील त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ते म्हणतात, “तुमच्या मुलांना सीताजींच्या बहिणींची नावं शिकवा. प्रभू श्रीरामाच्या भावांची नावं शिकवा. मी एक संकेत देतोय, ज्यांना समजेल त्यांनी टाळ्या वाजवाव्यात. तुमच्या मुलांना रामायण ऐकायला लावा आणि गीता वाचायला लावा. नाहीतर, तुमच्या घराचे नाव ‘रामायण’ असेल पण तुमच्या घरातील ‘श्री लक्ष्मी’ कोणी दुसरंच घेऊन जाईल.”

लग्नानंतर ४ वर्षांनी सेलिब्रिटी जोडप्याच्या घरी चिमुकल्या सदस्याचं आगमन, व्हिडीओ शेअर करून दिली Good News

आता कुमार विश्वास यांचे हे वक्तव्य सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. त्यांचा व्हिडीओही खूप व्हायरल होत आहे. त्यांचं हे वक्तव्य लोक सोनाक्षी सिन्हा-झहीर इक्बालच्या लग्नाशी जोडत आहेत. कारण शत्रुघ्न सिन्हा यांच्या घराचे नाव ‘रामायण’ आहे, तिच्या भावांची नावं लव-कुश आहेत. तसेच तिला रामायणातील एका प्रश्नाचं उत्तर देता आलं नव्हतं. तसेच सोनाक्षी सिन्हाने जहीर इक्बालशी आंतरधर्मीय लग्न केलं आहे, त्यावरून त्यांनी घरातील ‘श्री लक्ष्मी’ म्हणत टोला लगावला आहे.

हेही वाचा – खूपच सुंदर आहे तितीक्षा तावडेचं सासरचं नवीन घर! दारावरची नेमप्लेट पाहिलीत का? सर्वत्र होतंय कौतुक, पाहा फोटो

मुकेश खन्ना यांनी सोनाक्षीवर केलेली टीका

सोनाक्षीने २०१९ मध्ये ‘कौन बनेगा करोडपती’ या शोमध्ये हजेरी लावली होती. शोमध्ये तिला ‘हनुमानाने संजीवनी बुटी कुणासाठी आणली होती?’ असा प्रश्न विचारला. त्याचे चार पर्याय सुग्रीव, लक्ष्मण, सीता आणि राम हे होते. सोनाक्षीला उत्तर आलं नाही, त्यामुळे तिने लाइफलाइन वापरली होती. यावरूनच मुकेश खन्ना यांनी तिच्यावर टीका करत ही तिची चूक नसून तिच्या वडिलांचे संस्कार कमी पडले असं म्हटलं होतं. यानंतर सोनाक्षीने त्यांना प्रत्युत्तर दिलं होतं.

“यापुढे तुम्ही माझ्या वडिलांनी माझ्यावर केलेल्या संस्कारांबद्दल काहीही बोलाल तेव्हा लक्षात ठेवा की तुम्ही माझ्या संगोपनाबद्दल असं घाणेरडं वक्तव्य केलं, तरीही त्यांच्याच संस्कारांमुळे मी आज जे बोलले ते आदराने बोलले आहे”, असं सोनाक्षी म्हणाली होती.

Story img Loader