अभिनेता अंकित मोहनच्या घरी नुकतंच एका नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. त्याची पत्नी अभिनेत्री रुची सवर्ण हिने एका गोड मुलाला जन्म दिला आहे. अंकितने सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे. खास पोस्ट शेअर करत त्यांनी ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे. यानंतर अनेक सेलिब्रिटींनी कमेंट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

अंकितने इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. यात त्याने वेलकम होम…Boy असे लिहिले आहे. तर त्यानंतर दुसरी एक पोस्ट शेअर करत त्याने चाहत्यांचे आभार मानले आहे. “आम्हाला इतके प्रेम आणि आशीर्वाद देणाऱ्या सर्वांचे खूप खूप आभार. आता आमच्या कुटुंबातील आणखी एका सदस्याला तुमचे सर्वांचे प्रेम मिळत आहे. रुची सवर्ण तुलाही खूप प्रेम,” असे त्याने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

अंकितने दिलेल्या गुडन्यूजनंतर अनेक सेलिब्रिटींनी कमेंट करत त्या दोघांनाही शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्या दोघांचे चाहतेही त्यांच्या अनेक फोटोंवर कमेंट करत शुभेच्छा देताना दिसत आहे.

हेही वाचा : प्रेग्नंट असल्याच्या चर्चांवर भारती सिंहने सोडलं मौन; म्हणाली “हे लपवता येत नाही…”

रुचि आणि अंकितने लवकरच आई बाबा होणार असल्याची बातमी यंदा गणपती बाप्पाच्या आगमनासोबतच शेअर केली होती. आहेत. खास फोटो शेअर करत त्यांनी ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली होती. हे फोटो शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये, “शुभ प्रसंगी शुभ बातमी…. नवीन पाहुणा लवकरच येतोय” असे त्यांनी म्हटले होते.

दरम्यान अभिनेता अंकित मोहन आणि त्याची पत्नी अभिनेत्री रुचि सवर्ण यांनी आजवर अनेक हिंदी आणि मराठी मालिकांसोबतच सिनेमांमध्ये देखील काम केलं आहे. अंकित आणि रुचिने अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केलंय. त्यासोबतच ‘फत्तेशिकस्त’ या सिनेमातही दोघं महत्वाच्या भूमिकेत झळकले होते. या सिनेमात अंकितने यसाजीची भूमिका साकारली होती. तर रुचि सोयराबाईंच्या भूमिकेत झळकली होती. यासोबतच अंकित मन फकिरा या सिनेमातही झळकला होता. लवकरच तो ‘पावनखिंड’ सिनेमात झळकणार आहे.

Story img Loader