करीना कपूर खान आणि सैफ अली खानचा लेक तैमूर अली खान एखाद्या सेलिब्रेटीपेक्षा काही कमी नाही. तैमूर घराबाहेर पडताच त्याचे फोटो काढण्यासाठी छायाचित्रकारांची गर्दी जमललेली असते. कधी तैमूर छायाचित्रकारांना माझे फोटो काढू नका असं सांगतानाही दिसतो. तर कधी फोटोसाठी विविध पोझ देतानाही दिसतो. तैमूरचे फोटो, व्हिडीओ सतत सोशल मीडियावर व्हायरल होतानाही दिसतात. बी-टाऊनमधील स्टारकिड्सला बऱ्याचदा ट्रोलिंगचा सामना देखील करावा लागतो. तैमूरच्याबाबतीत देखील असंच घडतं. ट्रोलिंग म्हणजे काय याचं त्याला अर्थही माहित नसताना विविध कमेंट्स केल्या जातात. याबाबत आता त्याच्या कुटुंबियांचा राग अनावर झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सैफची बहिण सोहा अली खानचा पती कुणाल खेमू आणि तैमूरची आत्या सबा अली खानने त्याला ट्रोल करण्याबाबत तीव्र राग व्यक्त केला आहे. बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीमध्ये कुणाल तैमूरला ट्रोल करण्याबाबत राग व्यक्त करत म्हणाला, “तुम्ही जर लहान मुलाचे फोटो काढण्यासाठी अगदी त्याच्या जवळ कॅमेऱ्या घेऊन जाता तेव्हा तो मुलगा जे वागतो त्यात समोरच्या व्यक्तीची चूकी आहे. कारण लहान मुलं काहीही करू शकतात. निव्वळ बसून एखाद्याला ट्रोल करणं खूप सोप्प आहे. कारण जे लोकं तैमूरला ट्रोल करतात त्यांना अधिक बदलण्याची गरज आहे.”

आणखी वाचा – रोहित शेट्टीच्या ‘सर्कस’मध्ये हिंदीसह मराठी कलाकारही झळकणार, पाहा चित्रपटाचं धमाल पोस्टर

तसेच सबाने देखील तैमूरसोबत एक फोटो शेअर करत इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत राग व्यक्त केला आहे. ती म्हणाली, “माझ्याजवळ येऊन जेव्हा लोकं मला बोलायचे की आम्ही तैमूरचे फॅन आहोत, आम्ही त्याला फॉलो करतो. हे ऐकून मी अगदी हैराण व्हायचे. तो अगदी वर्षाचा असल्यादरम्यानची ही गोष्ट असेल. लोकं ५ वर्षाच्या मुलाला देखील आज ट्रोल करतात. स्वतःला मुलाला फॉलो करतात आणि ट्रोल करतात. हे असं कसं? मुलं मोठी होत आहेत. हळूहळू गोष्टी शिकत जातील.”

आणखी वाचा – Photos : ट्रोल करणाऱ्यांकडे पाठ फिरवत निया शर्माने पुन्हा केलं हॉट फोटोशूट, फोटोंची रंगतेय चर्चा

तैमूरला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येतं याबाबत त्याच्या कुटुंबियांनी राग व्यक्त केला आहे. लहान मुलाला कळत नसतानाही एवढं ट्रोल करणं खरंच योग्य आहे का? हा प्रश्न खरंच डोळ्यासमोर उभा राहतो. मध्यंतरी माझे फोटो काढू नका असे तैमूर एका व्हिडीओमध्ये छायाचित्रकारांना सांगताना दिसला होता. त्यादरम्यान त्याला खूप जास्त ट्रोल करण्यात आलं होतं.