बॉलिवूड अभिनेता कुणाल खेमूनं २०१५ साली सैफ अली खानची बहीण आणि अभिनेत्री सोहा अली खानशी लग्न केलं. या दोघांना एक गोड मुलगी देखील आहे. पण नुकतंच एका मुलाखतीत कुणालनं त्याचा सासरी गेल्यानंतरचा अनुभव शेअर केला. जेव्हा कुणाल सासरी जातो तेव्हा त्याचं जावई म्हणून जोरदार स्वागत होतं पण करीना कपूरमुळे त्याला सासरी जेवण करणंही कठीण जातं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अलिकडेच सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत कुणाल खेमू म्हणाला, ‘जेव्हा मी सोहासोबत तिच्या घरी म्हणजे माझ्या सासरी जातो त्यावेळी तिथे मला जेवण करणं फारच कठीण जातं. माझ्या सासरी डिनर टेबल एखाद्या कॉमेडी शोच्या मंचापेक्षा कमी नसतं. खासकरून जेव्हा सैफ आणि करीना जेव्हा आमच्यासोबत डिनरला हजर असतात तेव्हा तिथे खूपच मस्ती मस्करी होते.’

आणखी वाचा- संजय दत्तनं लग्नाआधी रणबीर कपूरला दिला खास सल्ला, म्हणाला…

करीनाबद्दल बोलताना कुणाल म्हणाला, ‘करीना कपूर खूप विनोदी स्वभावाची व्यक्ती आहे. हे मला पहिल्या वेळीच समजलं होतं. पण आता जेव्हा मी त्यांच्या कुटुंबाचा एक भाग झालो आहे तर ती थोडी लाजरी देखील आहे हे देखील मला समजलं आहे. पण ती एवढी विनोदी आहे की, अनेकदा आम्ही जेवायला तर बसतो पण व्यवस्थित जेवण करू शकत नाही. कारण करीना एवढे विनोद आणि मस्करी करत असते की जेवण करणं फारच कठीण जातं. डिनर टेबल एखाद्या लाफ्टर क्लबसारखं वाटतं.’

आणखी वाचा- सोनाली कुलकर्णीलाही ‘चंद्रमुखी’ची भुरळ, जबरदस्त लावणीचा व्हिडीओ एकदा पाहाच

कामाबद्दल बोलायचं तर कुणाल खेमू अलिकडेच ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या ‘अभय’ या वेब सीरिजमध्ये दिसला होता. त्यानं यूपी पोलीस एसपी अभय प्रताप सिंह ही भूमिका साकारली होती. आगामी काळात तो ‘कंजूस मक्खीचूस’ आणि ‘मलंग २’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kunal khemu share his experience at pataudi palace says kareena kapoor is so hilarious makes it difficult to eat even mrj