छोट्या पडद्यावरील अभिनेत्री श्रद्धा आर्य ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. कुंडली भाग्य या मालिकेतून श्रद्धाने सगळ्यांची मने जिंकली. या मालिकेत श्रद्धाने प्रीतीची भूमिका साकारली आहे. श्रद्धाच्या स्टाईलचे चाहते वेडे आहेत. श्रद्धाही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. अनेकदा ती तिचे बोल्ड फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. मात्र नुकतंच श्रद्धाच्या एका पोस्टमुळे तिचे चाहते चिंतेत पडले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

श्रद्धाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात तिने पती राहुल नागलसोबत भांडण झाल्याचे सांगितले आहे. तिने या व्हिडीओद्वारे गेल्या तीन दिवसांपासून ती आणि तिचा पती बोलत नसल्याची तक्रार केली आहे. श्रद्धाने शेअर केलेल्या या व्हिडीओत ती फार उदास असल्याचे दिसत आहे. तसेच तिचे केसही विखुरलेले दिसत आहे. श्रद्धा आणि राहुलचे लग्न होऊन अवघे तीन महिने झाले आहेत. मात्र त्यांचे भांडण नेमकं कोणत्या कारणामुळे झाले, याचा विचार चाहते करताना दिसत आहे.

श्रद्धाने इन्स्टाग्राम व्हिडीओ शेअर करत त्याला कॅप्शन दिले आहे. यावर ती म्हणाली की, ‘मी आणि माझ्या पतीने ठरवले होते की आम्ही कधीही रागावून बेडवर झोपणार नाही.’ यासोबतच तिने सांगितले की, गेल्या तीन दिवसांपासून माझे माझ्या पतीसोबत भांडण सुरू आहे. यात तिच्या व्हिडीओमध्ये श्रद्धा आर्यचा नवरा फोनमध्ये व्यस्त दिसत आहे. यानंतर थोड्या वेळाने ती त्याचा व्हिडीओ बनवत असल्याचे दिसत आहे. यावेळी त्याची प्रतिक्रिया पाहण्यासारखी असल्याची दिसत आहे. श्रद्धा आर्यच्या या व्हिडीओला लाखो लाईक्स मिळाले आहेत.

अल्लू अर्जूनच्या ‘पुष्पा’ लूकसाठी अशी व्हायची तयारी, पाहा पडद्यामागचा व्हिडिओ

श्रद्धा आर्याच्या या व्हिडीओवर अनेक कमेंट पाहायला मिळत आहे. श्रद्धाचे अनेक सहकारी कलाकार यावर हसणारे इमोजी पोस्ट करताना दिसत आहे. श्रद्धाने ‘मै लक्ष्मी तेरे आंगन की’, ‘तुम्हारी पाखी’ आणि ‘ड्रीम गर्ल’ या मालिकांमध्येही मुख्य भूमिका साकारली आहे. मालिकांसोबत तिने ‘पाठशाला’ आणि ‘निशब्द’ या सिनेमांमध्येही महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.