छोट्या पडद्यावरील ‘कुंडली भाग्य’ ही मालिका अतिशय लोकप्रिय आहे. या मालिकेने अनेकांची मने जिंकली होती. मालिकेतील धीरज धूपार (करण), श्रद्धा आर्या (प्रीता), मनित जौरा (रिषभ), अभिषेक कपूर (समीर) आणि अंजुम फकिह (सृष्टी) या कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले होते. लॉकडाउनमुळे मालिकेचे चित्रीकरण थांबवण्यात आले होते. पण आता सरकाराने दिलेल्या परवानगीनंतर पुन्हा चित्रीकरण सुरु करण्यात आले आहे. लॉकडाउनच्या काळात मिळालेल्या वेळात अभिनेता धीरज धूपारने मात्र त्याच्या आवडत्या गोष्टी केल्या होत्या.

कुंडली भाग्य या मालिकेच्या चित्रीकरणास सुरूवात करण्याआधी धीरजने अनेक चविष्ठ भारतीय पदार्थ तयार करून बायकोला खायला घातले होते. जर तो अभिनेता बनला नसता तर त्याने एक चांगले हॉटेल खोलले असते असे इच्छा देखील त्याने व्यक्त केली आहे.

आपल्या या सीक्रेट पॅशनबद्दल धीरज बोलताना म्हणाला, “लॉकडाउनदरम्यान मी माझ्या बायकोचे खूप लाड केले. मला पराठे खूप छान बनवता येऊ लागले होते. त्यामुळे मी तिच्या वाढदिवशी कोबीचे पराठे बनवले होते. त्याआधी मी बटाट्याचे पराठेही बनवले होते. जर मी अभिनेता झालो नसतो तर कुकिंगमध्ये करिअर केले असते. हॉटेल उघडायला मला आवडले असते.”

कुंडली भाग्य या मालिकेचे पुन्हा चित्रीकरण सुरु झाले आहे. आता लॉकडाउननंतर मालिकेमध्ये काय वेगळं पाहायला मिळणार हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

Story img Loader